टाटाचा धमाका! लाँच केली पंच CNG, किंमत फक्त 7.10 लाख!

WhatsApp Group

Tata Punch CNG Launched : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी Tata Motors ने अधिकृतपणे आपली बहुप्रतिक्षित SUV पंच CNG विक्रीसाठी आज म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी लाँच केली आहे. ही SUV एकूण 5 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली गेली आहे, ज्याची किंमत 7.10 लाख ते 9.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ऑफर केली गेली आहे.

विशेष म्हणजे, ही किंमत प्रतिस्पर्धी Hyundai Exter च्या CNG व्हेरिएंटपेक्षा खूपच कमी आहे, ज्याची किंमत रु. 8.24 लाख आहे. पंच CNG तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे.

टाटा Tiago, Tigor आणि Altroz ​​नंतर टाटाने पंच सादर केली. हे चौथे CNG मॉडेल आहे. यामुळे टाटाचा सीएनजी पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे. सीएनजी व्हेरिएंट प्रत्येक पेट्रोल ट्रिमच्या तुलनेत सुमारे 1.60 लाख रुपयांनी महाग आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे. पंच CNG कंपनीने मागील ऑटो एक्स्पो दरम्यान प्रथम प्रदर्शित केली होती, ती त्याच्या विभागातील सर्वात सुरक्षित SUV कार आहे, तिला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा – International Beer Day 2023 : बिअरमुळे किडनी स्टोन निघून जातो? खरंय का हे?

टाटा पंच CNG पॉवर आणि परफॉरमन्स

पंच CNG मध्ये, कंपनीने तेच 1.2-लिटर, तीन-सिलेंडर इंजिन वापरले आहे जे पेट्रोल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन पेट्रोलसह 86hp पॉवर आणि 113Nm टॉर्क आणि CNG मोडमध्ये 73.4hp पॉवर आणि 103Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि ते फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह दिले जाते. म्हणजेच सीएनजी ग्राहकांना ऑटोमॅटिकचा लाभ मिळणार नाही.

टाटा पंच iCNG व्हेरिएंट आणि किंमती

व्हेरिएंट किंमत (एक्स-शोरूम)
Pure 7,09,900
Adventure 7,84,900
Adventure Rhythm 8,19,900
Accomplished 8,84,900
Accomplished Dazzle S 9,67,900

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment