TATA काय ऐकत नाय..! ‘या’ सर्व गाड्या होणार इलेक्ट्रिक; तुमचेही वाचणार पैसे!

WhatsApp Group

TATA Electric cars : देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यावेळच्या ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी खेप जगासमोर सादर करण्यासाठी सज्ज आहे. टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेतील चारचाकी इलेक्ट्रिक वाहन विभागातील एक लीडर म्हणून उदयास येत आहे. आता कंपनी ऑटो एक्सपोमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने सोशल मीडियावर आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांचा टीझर देखील जारी केला आहे, हा टीझर पाहून, कंपनी आपल्या सध्याच्या सफारी, हॅरियर आणि अल्ट्रोज सारख्या मॉडेल्सच्या इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करू शकते अशी अटकळ बांधली जात आहे.

टाटा मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये त्यांचे दोन संकल्पना मॉडेल्स Curvv आणि Avinya देखील समोर आणतील. नवीन टीझरनुसार, कंपनी सफारी, हॅरियर आणि प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्राचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करेल. ते सर्व प्लॅटफॉर्मवर आधारित असतील, परंतु त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये टाटा मोटर्सचे खास Ziptron तंत्रज्ञान पाहता येईल, जे Nexon, Tiago आणि Tigor Electric मध्ये वापरले जाते.

हेही वाचा – Flipkart ची बंपर ऑफर..! २१ हजारवाला Realme 9 फक्त १९९९ रुपयांमध्ये, ‘असा’ करा खरेदी!

Altroz ​​हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट कंपनीने २०१९ मध्ये जिनिव्हा मोटर शो दरम्यान सादर केले होते. त्याचे उत्पादन-तयार मॉडेल लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा होती, परंतु कोरोना महामारीमुळे ही योजना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी तिच्या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये तीन-फेज PMSM इलेक्ट्रिक मोटर वापरेल, जी ३०.२ kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल. त्याची इलेक्ट्रिक मोटर १२९ PS पॉवर आणि २४५ Nm टॉर्क जनरेट करते.
असा विश्वास आहे की Altroz ​​EV एका चार्जवर ३१२ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करेल आणि त्याची बॅटरी सामान्य १५ amp घरगुती सॉकेटसह ८ ते ९ तासांमध्ये चार्ज केली जाऊ शकते. मात्र, टाटा मोटर्सने या कारचे तपशील आणि फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Tata Curvv आणि Avinya

या दोन्ही कॉन्सेप्टचे नुकतेच अनावरण करण्यात आले, Curvv सेकेंड जनरेशनच्या EV आर्किटेक्चरवर तर Avinya थर्ड जनरेशनच्या EV आर्किटेक्चरवर आधारित आहे. असे सांगितले जात आहे की थर्ड जनरेशनमध्ये अॅडवान्स ड्रायव्हर असिस्टन्स स्टिस्टीमसह एक सुधारित बॅटरी पॅक समाविष्ट केला जाईल, जो कारला फक्त ३० मिनिटांत इतकी शक्ती देईल की ती ५०० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.

Tata Safari आणि Harrier EV

Tata Safari आणि Harrier हे दोन्ही मॉडेल कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहेत. कंपनी यामध्ये मोठा बॅटरी पॅक वापरू शकते अशी अपेक्षा आहे. हे शक्य आहे की कंपनी त्यात ६० kWh क्षमतेचा बॅटरी पॅक समाविष्ट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही एसयूव्ही सुमारे ४०० ते ४५० किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसह लॉन्च केल्या जाऊ शकतात. या SUV बद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नसली तरी त्याबद्दल काहीही सांगणे घाईचे आहे. ऑटो एक्स्पो दरम्यान, टाटा मोटर्सच्या या इलेक्ट्रिक वाहनांची रेंज जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment