रतन टाटांची ड्रीम कंपनी ‘टाटा मोटर्स’चे होणार दोन तुकडे!

WhatsApp Group

Tata Motors | टाटा समूहाने अलीकडेच टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ तब्बल 20 वर्षांनंतर बाजारात आणला होता. आता टाटा मोटर्सबाबत समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत, समूहाच्या टाटा मोटर्स लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले की, कंपनीने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. विभाजनानंतर एक कंपनी व्यावसायिक वाहनांवर तर दुसरी कंपनी प्रवासी वाहनांवर लक्ष केंद्रित करेल.

ही विभागणी प्रक्रिया आधीच इलेक्ट्रिक आणि खासगी वाहनांचा व्यवसाय विभक्त करण्यासाठी सुरू आहे, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. यामुळे दोन्ही कंपन्यांना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात मदत होईल. टाटा मोटर्सने सांगितले की, त्यांची व्यावसायिक वाहने, प्रवासी वाहने (इलेक्ट्रिक वाहनांसह) आणि जॅग्वार लँड रोव्हर गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या विकास धोरणांसह काम करत आहेत. 2021 पासून, या कंपन्या त्यांच्या संबंधित सीईओंसह स्वतंत्रपणे काम करत आहेत.

डिमर्जर प्रक्रिया एक ते दीड वर्षात पूर्ण होईल

टाटा मोटर्सचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्षे लागतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही कंपनीचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागतो. कंपनीच्या विभाजनानंतर, सध्याच्या समभागधारकांकडे दोन्ही नवीन कंपन्यांमध्ये जेवढे समभाग आहेत तेवढेच समभाग टाटा मोटर्समध्ये असतील.

टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे दोन स्वतंत्र भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील एक कंपनी केवळ व्यावसायिक वाहनांवर, तर दुसरी खासगी वाहनांवर भर देणार आहे. जग्वार लँड रोव्हर इलेक्ट्रिक वाहनांवर काम करेल. एवढेच नाही, तर दोन्ही नवीन कंपन्या शेअर बाजारात स्वतंत्र व्यवसायही करणार आहेत.

हेही वाचा – पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, घरबसल्या मिळवा दरमहा 20,000 रुपये!

याबाबत माहिती देताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत चांगले पुनरागमन केले आहे. कंपनीचे तिन्ही ऑटोमोटिव्ह बिझनेस युनिट स्वतंत्रपणे काम करत आहेत. ते म्हणाले, या विभागामुळे तिन्ही कंपन्यांना बाजाराचा पुरेपूर फायदा घेता येईल. स्वतंत्र कंपन्या केल्यानंतर ते पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतील. याचा फायदा ग्राहक, कर्मचारी आणि भागधारक या तिघांना होणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment