Tata Harrier : हॅरियर ही टाटा मोटर्सच्या सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारचे मॉडेल आहे. या कारने भारतात विक्रीचा नवा विक्रम केल्याचे वृत्त आहे. टाटाने ही कार लॉन्च केल्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाल्याची माहिती आहे. ही कार पहिल्यांदा टाटाने जानेवारी 2019 मध्ये लॉन्च केली होती.
हॅरियरने विक्री सुरू केल्यापासून अवघ्या 4 वर्षांत एवढा मोठा विक्रीचा आकडा गाठला आहे. टाटा मोटर्सने ही कार आपल्या ओमेगा-आर्क प्लॅटफॉर्मवर बनवली आहे. हॅरियर हे या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेले टाटा कारचे पहिले मॉडेल आहे. काही Jaguar Land Rover SUVs त्याच्या T8 प्लॅटफॉर्मचा वापर करून तयार केल्या आहेत. उदाहरणार्थ, रेंज रोव्हर एसयूव्ही कारचे मॉडेल या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. हेच कारण आहे की टाटा हॅरियर एसयूव्ही लँड रोव्हर एसयूव्ही कार्ससारखी आकर्षक दिसते.
Join us as we celebrate our monumental achievement 🥳
Conquering the roads of India, we've achieved an impressive milestone of 1 lakh units😍Stay tuned for all the excitement that lies ahead! #1LakhPowerful #TataMotorsPassengerVehicles #Harrier #TataHarrier pic.twitter.com/1iE162cVX5
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) May 18, 2023
फीचर्स
भारतात SUV चे मार्केट कायम ठेवण्यासाठी, टाटा ने वेळोवेळी अपडेट केलेले मॉडेल आणि स्पेशल एडिशन लॉन्च केल्या आहेत. टाटाची ही रणनीती कारच्या प्रचंड विक्रीचे मुख्य कारण आहे. आत्तापर्यंत, टाटा हॅरियर डार्क एडिशन, कॅमो एडिशन आणि रेड डार्क एडिशन यासारख्या अनेक विशेष एडिशनमध्ये मिळते. याशिवाय टाटा या 5 सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 19 भिन्न पर्याय देखील ऑफर करतो.
सुरुवातीची किंमत रु. 15 लाख
या कारची सुरुवातीची किंमत रु. 15 लाख आणि टॉप मॉडेलची किंमत रु. 24.07 लाख आहे. दोन्हीच्या एक्स-शोरूम किमती सारख्याच आहेत. टाटाने या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये लक्झरी फीचर्स, आधुनिक तांत्रिक फीचर्स आणि सुरक्षा फीचर्स आहेत. विशेषत: सुरक्षेच्या बाबतीत तडजोड न करता येणारे वाहन म्हणून त्याची रचना करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने हॅरियर कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये ADAS (Advanced Driver Assistant System) सिस्टीम दिली आहे. हॅरियर वापरकर्ते या एकाच फीचरद्वारे विविध सुरक्षा फीचर्सचा लाभ घेऊ शकतात.