टाटा विकणार ‘ही’ कंपनी? गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ, शेअर्समध्ये घसरण!

WhatsApp Group

Tata Group News In Marathi : टाटा समूहाकडून मोठी बातमी समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, बाजारपेठेतील वाढती स्पर्धा आणि आव्हाने पाहता टाटा समूह आपली होम अप्लायन्स कंपनी व्होल्टास लिमिटेड (Voltas Limited) विकण्याचा विचार करत आहे. टाटा समूहाचे व्यवस्थापन या कंपनीच्या विक्रीचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या या करारात आर्सेलिक एएस या संयुक्त उपक्रमाचा समावेश करावा की नाही याचाही विचार केला जात आहे.

कंपनीच्या विक्रीचा विचार प्राथमिक टप्प्यात

लाइव्ह मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कंपनीच्या विक्रीचा सध्या विचार केला जात असून तो अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. दीर्घ कालावधीसाठी मालमत्ता ठेवण्याचा पर्याय देखील टाटा समूह निवडू शकतो. टाटा समूहाने कंपनी विकण्याच्या कल्पनेनंतर तिच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. मंगळवारी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी व्होल्टास लिमिटेडचा समभाग 13.60 अंकांनी घसरला आणि 813.80 रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा – Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला सोने, पितळ का खरेदी करतात माहितीये?

ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला हा शेअर 827.90 रुपयांवर उघडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान तो 829.20 च्या उच्च आणि 811.70 अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. यानंतर शेअर घसरला आणि 813.80 अंकांवर बंद झाला. शेअरच्या 52 आठवड्यांच्या उच्च पातळीबद्दल बोलायचे तर, तो 933.50 अंक आणि निम्न पातळी 737.60 अंक आहे. टाटा समूहाच्या प्रतिनिधीने अशा कोणत्याही वृत्ताचे खंडन केले आहे.

कंपनीचा इतिहास

एसी, वॉटर कूलर आणि व्यावसायिक रेफ्रिजरेशन तयार करणारी व्होल्टोस लिमिटेड 1954 मध्ये सुरू झाली. भारताव्यतिरिक्त, कंपनीचा व्यवसाय मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आणि आफ्रिकेत पसरलेला आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर कंपनीचे मार्केट कॅप सुमारे $3.3 बिलियन झाले. व्होल्टासने भारतातही आर्सेलिकसोबत पैसा कमावला आहे. तसेच व्होल्टास बेको ब्रँड अंतर्गत घरगुती उपकरणांची सीरिज देशांतर्गत बाजारात सादर केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment