Tata कडून मोठा धमाका..! दोन सिलिंडरवाली CNG गाडी लाँच; किंमत…

WhatsApp Group

Tata Altroz CNG Launched : Tata Motors ने अखेर आज आपली प्रिमियम हॅचबॅक कार Altroz ​​चे नवीन CNG व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. नुकतेच या कारचे अधिकृत बुकिंग सुरू झाले. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सजलेल्या या कारची सुरुवातीची किंमत 7.55 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या कारची प्रामुख्याने बाजारात मारुती बलेनो सीएनजीशी स्पर्धा होईल. ही देशातील पहिली सीएनजी कार आहे, ज्यामध्ये ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला कारच्या बूट स्पेसशी तडजोड करावी लागणार नाही.

Tata Altroz ​​CNG बद्दल खास

ही कार नियमित Altroz ​​मॉडेलसारखीच आहे, त्याच्या बाह्य भागामध्ये कोणतेही मोठे बदल केले गेले नाहीत. त्यात ‘iCNG’ बॅजिंग देण्यात आले आहे. टाटा मोटर्सने त्यात 30-30 लिटरच्या दोन सीएनजी टाक्या दिल्या आहेत, ज्यात बूटमध्ये एका प्लेटखाली जागा देण्यात आली आहे. हे तुम्हाला कारच्या बूटमध्ये जवळपास 210 लीटर बूट स्पेस देते. जरी दोन्ही सिलिंडर कमी जागा व्यापत असले तरी, बूट स्पेस स्टँडर्ड अल्ट्रोझ (पेट्रोल-डिझेल) पेक्षा जवळपास 135 लीटर कमी आहे ज्याची बूट स्पेस 345 लीटर आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today : 2000 रुपयांच्या नोटबंदीनंतर सोने-चांदी स्वस्त? वाचा आजचा दर!

व्हेरिएंट आणि किंमत

व्हेरिएंट्स  किंमत (एक्स-शोरूम)
Altroz iCNG XE 7,55,400 रुपये
Altroz iCNG XM+ 8,40,400 रुपये
Altroz iCNG XM+ (S) 8,84,900 रुपये
Altroz iCNG XZ 9,52,900 रुपये
Altroz iCNG XZ+ (S) 10,02,990 रुपये
Altroz iCNG XZ+O (S) 1,054,990 रुपये

या कारमध्ये 1.2L Revotron द्वि-इंधन इंजिन आहे जे पेट्रोल मोडमध्ये 88Ps पॉवर आणि 115Nm पीक पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. तर CNG मोडमध्ये, हे इंजिन 73.5 Ps पॉवर आणि 103Nm टॉर्क जनरेट करते. या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकमध्ये सिंगल अॅडव्हान्स EUC आणि डायरेक्ट स्टेट CNG सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

एका आवाजावर उघडेल सनरूफ

या सीएनजी कारमध्ये कंपनी व्हॉईस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ देत आहे, जी व्हॉईस कमांडद्वारे ऑपरेट केली जाईल. म्हणजेच, आपण आवाज द्याल आणि त्याचे इलेक्ट्रिक सनरूफ उघडेल आणि बंद होईल. प्रीमियम हॅचबॅक सीएनजी कार म्हणून, हे फीचर खूप चांगले आहे. याशिवाय कंपनी या कारमध्ये अनेक उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स देखील समाविष्ट करत आहे, जी सीएनजी कारकडून अपेक्षित आहे.

सीएनजी गळती झाल्यास सुरक्षा व्यवस्था

टाटा मोटर्सने या सीएनजी कारमध्ये अनेक उत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट केले आहेत. त्याच्या फ्युएल लीडमध्ये एक मायक्रो स्वीच असतो, जेव्हा तुम्ही पेट्रोल किंवा सीएनजी भरण्यासाठी जाता तेव्हा हा मायक्रो स्विच कारचे इग्निशन बंद करतो आणि कारमध्ये इंधन रिफिल होताच आणि लिड कॅप व्यवस्थित बंद होते. इग्निशन चालू होते. म्हणजेच गाडी सुरू होते. सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर खूप चांगले आहे. सहसा तुम्ही इंधन स्टेशनवर जाता तेव्हा तुम्हाला कार बंद करण्यास सांगितले जाते.

Leave a comment