Tamil Nadu : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. स्फोटाचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. शनिवारी सकाळी झालेला हा स्फोट इतका जोरदार होता की, जवळच्या हॉटेलची इमारतही कोसळली, तर इतर चार इमारतींचे अंशत: नुकसान झाले, त्यामुळे अनेक लोक अडकले. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत 12 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यासाठी आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तासनतास प्रयत्न केले. वृत्त लिहेपर्यंत ढिगाऱ्याखाली एकूण किती लोक अडकले आहेत, याची माहिती बचावकर्त्यांना मिळू शकलेली नाही.
हेही वाचा – 3 रुपयाचा शेअर पोहोचला 1200 रुपयांवर, 25 हजार गुंतवणारे बनले करोडपती!
#WATCH | Few people feared dead in explosion in firecrackers factory in Krishnagiri district of Tamil Nadu; further details awaited pic.twitter.com/cOImAJy35y
— ANI (@ANI) July 29, 2023
कृष्णगिरीचे पोलीस अधीक्षक सरोज कुमार ठाकोर यांनी सांगितले की, पझायापेट्टई भागात रवी नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. ठाकोर म्हणाले, “किमान सात जणांना मृत घोषित करण्यात आले आहे आणि इतर काही जखमींना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे.”
ठाकोर यांनी नंतर सांगितले की या अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला, तर जखमी आणि बचावलेल्या लोकांना उपचारासाठी कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटाच्या परिणामामुळे हॉटेलची इमारत पूर्णपणे कोसळली आणि जवळपासच्या तीन-चार घरांचे अंशत: नुकसान झाले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!