Dayaben Suffering Cancer news : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडे जुन्या तारक मेहताने शो सोडल्याची बरीच चर्चा होती. आता बातमी आली की दिशा वकानी म्हणजेच दयाबेनला कॅन्सर झाला. ही बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. पण ही बातमी किती खरी आहे याचा खुलासा जेठालाल यांनी केला आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानी बऱ्याच दिवसांपासून तारक मेहतामध्ये दिसलेली नाही. दयाबेन या शोमध्ये दिसणार की नाही हे अद्याप समजलेले नाही.
दिशा वकानीला घशाचा कर्करोग झाल्याचे नुकतेच समोर आले. असे म्हटले जात आहे की दिशा वाकाणीला बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये तिच्या विचित्र आवाजामुळे हा त्रास झाला होता. मात्र रील लाइफमध्ये दयाबेन यांचे पती जेठालाल यांनी याबाबत खुलासा केला आहे. मीडिया हाऊसशी संवाद साधताना दिलीप जोशी यांनी सांगितले, सकाळपासून त्यांना याबाबत सतत फोन येत आहेत. दिलीप जोशी म्हणाले, ”मी एवढेच म्हणेन की या सर्व अफवा आहेत आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.”
हेही वाचा – उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार जाहीर..! ‘या’ मंडळाचा राज्यात पहिला नंबर
#DishaVakani #DayaBen #TaarakMehtaKaOoltahChashmah #Cancer #ThroatCancer #Daya pic.twitter.com/wjnkbzOyoe
— Divya Rana (@AssomsMedia) October 12, 2022
याबाबत दिशा वकानी यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दिशा वकानी बऱ्याच दिवसांपासून शोमधून गायब आहे. त्यांच्या जाण्यानंतर शोचे निर्माते असित मोदी यांना दयाबेनसाठी कोणताही चेहरा सापडलेला नाही. त्याचबरोबर चाहतेही तिला खूप मिस करत आहेत.