T20 World Cup 2024 India vs Pakistan Match Tickets Price : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप 2024 साठी पूर्णपणे तयार आहे. 2 जून ते 29 जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या कालावधीत न्यूयॉर्कमध्ये 8 सामने खेळवले जातील. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील महान स्पर्धेचाही समावेश आहे.
आयसीसीनेही याबाबत तिकीट जारी केले असून, त्याची किंमत लाखोंमध्ये आहे. आयसीसीनुसार, डायमंड श्रेणीच्या तिकिटाची किंमत 20 हजार डॉलर्स (सुमारे 16.65 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. हे पाहून इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जनक ललित मोदी संतापले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याने आयसीसीला आरसाही दाखवला.
25 हजार रुपयांपासून तिकिटाची किंमत
खरेतर, राजकीय तणावामुळे 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. तेव्हापासून हे दोन संघ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये नेहमीच आमनेसामने आले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये क्रेझ खूप वाढली आहे. अशा स्थितीत आयसीसीलाही याचा फायदा घ्यायचा असून तिकिटाची किंमत लाखो रुपये ठेवली आहे. आयसीसीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत 300 डॉलर्स (सुमारे 25 हजार) पासून सुरू झाली आहे.
हेही वाचा – Maldives Service For Indians : मालदीव उचलणार मोठे पाऊल, भारतीयांना देणार विशेष सुविधा!
मोदींनी आयसीसीला फटकारले
मोदींनी लिहिले, ”आयसीसी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी डायमंड क्लबची तिकिटे 20 हजार डॉलरमध्ये विकत आहे हे जाणून धक्का बसला. नफा कमावण्यासाठी नव्हे तर या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चाहत्यांना जोडण्यासाठी हा विश्वचषक अमेरिकेत आयोजित केला जात आहे. 2750 डॉलर (सुमारे 2.28 लाख रुपये) मध्ये तिकीट विकणे म्हणजे क्रिकेट नाही.”
उपलब्ध तिकिटांमध्ये डायमंड श्रेणीच्या तिकिटाची किंमत 10 हजार डॉलर (सुमारे 8.32 लाख) देण्यात आली आहे. तर सर्वात कमी किमतीचे तिकीट $2750 (सुमारे 2.28 लाख रुपये) दाखवले गेले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा