

T20 World Cup 2022 IND vs BAN : टी-२० विश्वचषकात तिसऱ्या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. भारताने स्पर्धेतील सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ६ गडी बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात अतिशय वेगवान झाली. ७ षटकांनंतर बांगलादेशने बिनबाद ६६ धावा केल्या. सलामीवीर लिटन दास आक्रमक अदांजात खेळत होता. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य मिळाले. पण बांगलादेश संघ ६ विकेट्सच्या बदल्यात १४५ धावाच करू शकला.
भारत ऑन टॉप!
सुपर-१२ च्या ग्रुप-२ बद्दल बोलायचे झाले तर भारताचा ४ सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. या विजयासह भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचे ३ सामन्यांत ५ गुण झाले असून ते पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आले आहेत. बांगलादेशचा ४ सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ६ नोव्हेंबरला भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे.
हेही वाचा – IND Vs BAN : केएल राहुलचा ‘विराट’ SIX पाहून कोहलीही थक्क..! पाहा Video
India go top of Group 2 and stay on course for the semis 👊#T20WorldCup pic.twitter.com/2nxalS9li2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 2, 2022
पाकिस्तानचे काय?
पाकिस्तानचे ३ सामन्यांत २ गुण आहेत. त्यांना उद्या दक्षिण आफ्रिका आणि ६ नोव्हेंबरला शेवटचा सामना बांगलादेशशी करायचा आहे. उपांत्य फेरीत कायम राहण्यासाठी त्याला दोन्ही सामने जिंकावे लागतील. दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामना ६ नोव्हेंबरला नेदरलँड्सशी होणार आहे. जरी ते पाकिस्तानकडून हरले तरी त्यांना नेदरलँड्सविरुद्ध जिंकून ७ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. अशा स्थितीत दोन्ही सामने जिंकूनही पाकिस्तानचा संघ बाद होईल.