Supreme Court On Patanjali | सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीची उत्पादने आणि त्यांच्या औषधी प्रभावांचा दावा करणाऱ्या विधानांबाबत न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे प्रथमदर्शनी उल्लंघन केल्याबद्दल फटकारले आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए अमानुल्ला यांच्या खंडपीठाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली आणि त्यांच्यावर अवमानाची कारवाई का करू नये, अशी विचारणा केली. दरम्यान, पतंजलीचे मीडिया प्रभारी एसके तिजारावाला म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल ते आम्ही पाळू. न्यायपालिकेच्या आदेशाचा आदर करू.
औषध उपचारांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली कंपनीला झापले आहे. खंडपीठाने पतंजली आयुर्वेद आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्रात म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही औषध प्रणालीच्या विरोधात, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमांमध्ये कोणत्याही स्वरूपात कोणतेही विधान करण्यापासून सावध केले. कंपनीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलाने गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते की, यापुढे कायद्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले जाणार नाही, विशेषत: जाहिराती देणे किंवा उत्पादनांचे ‘ब्रँडिंग’ करणे. शिवाय, पतंजली उत्पादनांच्या औषधी परिणामकारकतेचा दावा करणारे कोणतेही विधान केले जाणार नाही किंवा कोणत्याही उपचार पद्धतीच्या विरोधात तथ्य नसलेले कोणतेही विधान कोणत्याही स्वरूपात माध्यमांमध्ये जारी केले जाणार नाही. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला विविध रोगांच्या उपचारांसाठीच्या औषधांबद्दल जाहिरातींमध्ये ‘खोटे’ आणि ‘भ्रामक’ दावे करण्यापासून सावध केले होते.
हेही वाचा – Voter ID Card : मतदान ओळखपत्र हरवलंय? ‘असं’ मिळवू शकता नवं कार्ड!
संपूर्ण भारताला फसवले जात आहे आणि सरकार डोळे बंद करून बसले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. रामदेव लसीकरण आणि आधुनिक औषधांविरोधात प्रचार मोहीम राबवत असल्याचा आरोप करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!