Hrithik Roshan on Laal Singh Chaddha : बॉलिवूडचा हॉलिवूड हिरो हृतिक रोशननं आमिर खान आणि करीना कपूर स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा मुंबईतील एका थिएटरमध्ये पाहिला. यानंतर त्यानं हा चित्रपट कसा आहे, ते सांगितलं. ह्रतिकनं आमिरचा हा एक उत्कृष्ट चित्रपट असल्याचं म्हटलं. त्यानं आमिर आणि चित्रपटाच्या टीमचंही कौतुक केलं. हृतिकनं आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शनिवारी मुंबईतील एका थिएटरमध्ये चित्रपट पाहिला. थिएटरमधून बाहेर पडताना हृतिक दिसला होता. हृतिकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘लाल सिंह चड्ढा’चा रिव्ह्यू शेअर केला आहे.
हृतिकला कसा वाटला सिनेमा?
हृतिकनं त्याच्या इन्स्टा स्टोरीवर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना लिहिलं, “आत्ताच लाल सिंग चड्ढा पाहिला. या चित्रपटाला मी माझ्या मनातून फील केलं. प्लस आणि मायनस बाजूला ठेवला, तरी हा सिनेमा जबरदस्त आहे. मित्रांनो हा चित्रपट मिस करू नका! जा! आता जा. सिनेमा पाहा. सुंदर आहे. खूप सुंदर.” ‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ पाहून इंग्लंडचा क्रिकेटर चांगलाच संतापला; म्हणाला, “लज्जास्पद…”
‘लाल सिंग चड्ढा’ हा ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. आमिर आणि करीनाशिवाय या चित्रपटात नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऑस्करनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ‘लाल सिंग चड्ढा’ ची जबरदस्त क्लिप शेअर केली. ऑस्कर विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ची जादू ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये उपलब्ध असल्याचं सांगितलं.
अकादमीनं त्यांच्या ट्वीटमध्ये क्लिप शेअर करताना म्हटलं, “रॉबर्ट जेमिकिस आणि एरिक रॉथ यांनी त्यांच्या साधेपणानं आणि दयाळूपणानं जग कसं बदलतं याची त्यांची कहाणी सांगितली आणि अद्वैत चंदन आणि अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्येही हे सांगितलं आहे. टॉम हँक्सनं ‘फॉरेस्ट गंप’मध्ये तर आमिर खाननं ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
हेही वाचा – या ‘एक’ कारणामुळं आमिर खान बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही!
‘फॉरेस्ट गंप’नं जिंकले ६ ऑस्कर
१९९४ मध्ये या चित्रपटाला एकूण १३ कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. यानंतर, चित्रपटानं सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, चित्रपट संपादन, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकले. आमिर खाननं एक पत्र लिहून टॉम हँक्सला चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्युत्तरादाखल टॉम हँक्सच्या टीमनं सांगितलं, आहे की ते वेळापत्रकानुसार यावर निर्णय घेतील. यापूर्वी दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गच्या एका कार्यक्रमादरम्यान टॉम आणि आमिरची भेट झाली होती.