Launch Of India’s First Private Rocket Vikram-S : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने श्रीहरिकोटा येथून देशातील पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस प्रक्षेपित केले आहे. स्कायरूट एरोस्पेसने हे रॉकेट बनवले आहे. भारतातील प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. लॉन्चिंगवेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह देखील उपस्थित होते. स्कायरूट एरोस्पेसच्या या पहिल्या मोहिमेला ‘प्रारंभ’ असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये तीन ग्राहक पेलोड आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रवासात ही खरंच एक नवी सुरुवात, नवी पहाट आणि एक नवीन उपक्रम आहे. भारतासाठी स्वतःचे रॉकेट विकसित करण्याचा हा एक टर्निंग पॉईंट आहे आणि भारताच्या स्टार्टअप चळवळीतील एक टर्निंग पॉइंट आहे.
INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी या रॉकेटच्या प्रक्षेपणप्रसंगी सांगितले की, मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. स्कायरूट एरोस्पेसची ही सुरुवात आहे. या रॉकेटचे वजन सुमारे ५४५ किलो असल्याची माहिती आहे. त्याच वेळी, रॉकेट विकसित करणार्या स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने ट्विटमध्ये त्याचे यशस्वी प्रक्षेपण जाहीर केले. स्कायरूटने ट्वीटमध्ये लिहिले, लॉन्च! विक्रम-एस ने आकाशाला गवसणी घालणारे भारताचे पहिले खासगी रॉकेट म्हणून इतिहास रचला आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमच्यासोबत असल्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत.
हेही वाचा – ट्विटरवर ट्रेंड होतंय #RIPTwitter..! शेकडो कर्मचाऱ्यांचा स्वत: हून राजीनामा
India's first ever private rocket Vikram-S, named after Vikram Sarabhai, launched from Sriharikota in Andhra Pradesh. The rocket has been built by "Skyroot Aerospace". pic.twitter.com/DJ9oN0LPfH
— ANI (@ANI) November 18, 2022
विक्रम-एस का खास?
विक्रम-एसच्या यशामुळे अवकाशाच्या जगात अनेक मार्ग खुले होतील. विक्रम-एसकडून अनेक प्रयोग केले जात आहेत. रॉकेटने सब-ऑर्बिटल उड्डाण केले आहे. असे सांगितले जात आहे की हे सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे आणि त्याच्यासोबत तीन व्यावसायिक पेलोड पाठवले आहेत. या लॉन्चिंगमध्ये सामान्य इंधनाऐवजी एलएनजी म्हणजेच लिक्विड नॅचरल गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन (एलओएक्स) वापरण्यात आले आहे, जे किफायतशीर तसेच प्रदूषणमुक्त आहे. विक्रम-एसचे प्रक्षेपण हे एक प्रकारचे चाचणी उड्डाण आहे. जर ते यशस्वी झाले तर खासगी अंतराळ कंपनीच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या देशांमध्ये सामील होईल.