‘आता हे असलं करणार तू?’ म्हणत वडिलांनी सुनावलं, उभारली 2000 कोटींची कंपनी!

WhatsApp Group

Success Story : आपल्या देशात व्यवसाय सुरू करायचा म्हटला, की किती प्रश्न डोळ्यासमोर येतात हे तुम्ही जाणताच. परंतु सामान्यतः आपले कुटुंब देखील दुसरे काहीतरी काहीतरी करण्यास समर्थन देत नाही. असाच प्रकार सागर दरयानींच्या बाबतीत घडला. जेव्हा त्यांनी आपल्या मित्रांसोबत मोमोज विकण्याचा प्लॅन बनवला, तेव्हा त्यांच्या वडिलांनीच त्यांना सर्वात जास्त टोमणे मारले. सागर यांच्या वडिलांची इच्छा होती, की त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे. पण, सागर यांचा हेतू काही औरच होता. कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेत असतानाच त्यांनी व्यावसायिक होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवले. त्यांचा मित्र विनोद कुमार सोबत त्यांनी 30,000 रुपये गुंतवून मोमो बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी एक छोटा काउंटर सुरू केला. तिथेच त्याची कंपनी वाव! मोमोचा (Wow! Momo) पाया रचला गेला.

आज सागर दरयानींच्या तीन कंपन्या आहेत आणि त्यांचे मूल्यांकन 2000 कोटी रुपये आहे. ते त्यांच्या पार्टनरसह दरमहा 42 कोटी रुपये कमावतात. पिझ्झा-बर्गरसोबतच मोमोज हे आज सर्वाधिक विकले जाणारे फास्ट फूड आहे. सागर यांनी 15 वर्षांपूर्वी देशात मोमोज लोकप्रिय होतील हे ओळखले होते. अलीकडच्या काळात देशभरात मोमोजची बाजारपेठ खूप वाढली आहे. सागर दरयानी हे वाव! मोमोचे सीईओ (Wow! Momo) आहेत तर बिनोद कुमार सीओओची जबाबदारी पार पाडत आहेत.

हेही वाचा – गरिबांना 200 रुपयांनी स्वस्त मिळणार LPG सिलिंडर! मोदी सरकारची मोठी घोषणा

कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करताना सागर दरयानी यांनी पाहिले, की लोकांना मोमोज खूप आवडतात. त्याचा मित्र विनोद कुमार यांच्यासोबत मोमोजचा स्टॉल सुरू करण्याचा विचार त्यांनी केला. त्यांनी आपली योजना घरच्यांना सांगितल्यावर वडिलांना खूप राग आला. पण, सागरने आपला विचार बदलला नाही आणि 2008 मध्ये कोलकाता येथे मोमोज काउंटर सुरू केले. त्याचे काउंटर चांगले चालले आणि काही वेळातच त्याचे आउटलेट बनले.

दोन वर्षे कष्ट

सागर आणि विनोद यांची भरपूर विक्री होत होती, परंतु त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी दोन वर्षांपासून निधी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, सागर दरयानी यांनी हार मानली नाही. प्रत्येक अडचणीवर मात करत कष्ट करत राहिले. त्यांनी मोमोजचे काही खास प्रयोग केले. स्टीम मोमोजबरोबरच तंदूरी मोमोज, कॉकलेज मोमोज, फ्राय मोमोज यांसारख्या इतर प्रकारांचीही विक्री सुरू झाली.

तीन कंपन्या, 600 हून अधिक आउटलेट

छोट्याशा दुकानातून सुरू झालेला वाव! मोमोचा व्यवसाय आज देशभर पसरला आहे. आज त्यांची देशातील 26 राज्यांमध्ये 600 हून अधिक आउटलेट्स आहेत आणि त्याद्वारे दररोज 6 लाखांहून अधिक मोमोज विकले जातात. वाव! मोमो ही आता 2000 कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. सागर आणि विनोद यांनी त्यांच्या दोन उपकंपन्या Wow! China आणि Wow! Chicken लॉन्च केल्या आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये तिन्ही कंपन्यांचा महसूल 400 कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात वाव! मोमोने देशभरात 190 नवीन मोमो आउटलेट उघडले आहेत.

दर महिन्याला 42 कोटींची कमाई

सागर आणि विनोद या तिन्ही कंपन्यांमधून दरमहा सुमारे 42 कोटी रुपये कमावतात. वाव मोमोने यात सर्वाधिक योगदान दिले आहे. वाव मोमोची कमाई महिन्याला 25 कोटी आहे. याशिवाय वाव! चायनामधून 14 कोटी तर वाव! चिकनमधून दरमहा 3 कोटींची कमाई होते. कंपनीचे देशात तीन उत्पादन प्रकल्प आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment