बसमध्ये पेन विकणारा आज 3,000 कोटींच्या कंपनीचा मालक झालाय!

WhatsApp Group

असं म्हणतात की एक आयडिया तुमचे संपूर्ण आयुष्य पालटून टाकू शकते. असेच काहीसे कुंवर सचदेव (Kunwer Sachdev) यांच्यासोबत घडले. गल्लोगल्ली, बसमध्ये पेन विकणाऱ्या कुंवर सचदेव यांना अशीच एक आयडिया आली आणि त्यांनी थोड्या प्रमाणात भांडवल गुंतवून त्यांनी एक व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय फक्त भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये फोफावलाय. कुंवर सचदेव आज तब्बल 3 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत.

सचदेव यांची ही कहाणी हजारो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्याचे वडील रेल्वे लिपिक होते. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी सचदेव यांनी घरोघरी जाऊन पेन विकले आहेत. त्यांना मोठेपणी डॉक्टर व्हायचे होते. पण म्हणतात ना देव जेव्हा देतो, तेव्हा छप्परफाड देतो. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचा – जगातील सर्वात जास्त जमिनीचा मालक कोण? अनेक समुद्रकिनारेही यांच्याच मालकीचे!

केबल कंपनीत काम

कुंवर यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या काळात एका केबल कम्युनिकेशन कंपनीत मार्केटिंगचे काम केले. कंपनीत काम करत असतानाच त्यांना समजले, की देशातील केबल उद्योगाच्या वाढीसाठी भरपूर वाव आहे. त्यांनी नोकरी सोडून सु-काम कम्युनिकेशन्स (Su-Kam Communication) नावाची कंपनी स्थापन केली. नंतर ही कंपनी पूर्णपणे सौर उत्पादनांच्या निर्मितीमध्ये बदलली.

इन्व्हर्टरवरून आयडिया

कुंवर सचदेव स्वतः सांगतात, की त्यांना त्यांच्या घरात बसवलेल्या इन्व्हर्टरमधून सोलर प्रोडक्ट कंपनी बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी सांगितले की, घरात जुना इन्व्हर्टर बसवण्यात आला होता, ज्यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले होते. यानंतर त्यांनी इन्व्हर्टर बनवण्याचा निर्णय घेतला आणि 1998 मध्ये कंपनीचे नाव बदलून सु-कॅम पॉवर सिस्टम (Su-Kam Power System) असे केले. आज त्यांची कंपनी सर्व प्रकारची सोलर उत्पादने बनवते, ज्यांना देशातच नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे.

कुमार सचदेव यांनी सौरऊर्जेवर आधारित उत्पादने बनविण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि आज त्यांची कंपनी सोलरशी संबंधित इन्व्हर्टरही बनवते. उत्तम दर्जामुळे त्यांच्या उत्पादनांना देशातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे. सचदेव यांच्या व्यवसायाचे बाजारमूल्य आतापर्यंत सुमारे 2,300 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यांच्या सौर उत्पादनाची क्षमता सुमारे 10 तास टिकते. आत्तापर्यंत त्यांच्या कंपनीची उत्पादने लाखो घरांमध्ये वापरली गेली आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment