State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल आणि तुमच्या खात्यातून कोणतेही व्यवहार न करता आपोआप पैसे कापले जात असतील तर बँक तुमच्या खात्यातून हे पैसे का कापत आहे हे तुम्हाला या बातमीतून कळेल.
खात्यातून कापले जात आहेत ‘इतके’ रुपये!
सध्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जात असल्याचे चित्र आहे. यासोबतच १४७.५० रुपयांच्या कपातीचा मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत हा मेसेज पाहून अनेक ग्राहक बँकेत पोहोचले. बँकेच्या बाजूने याबाबत माहिती देताना एसबीआयकडून ग्राहकांच्या खात्यातून हे पैसे डेबिट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक हे पैसे मेंटेनन्स चार्ज म्हणून घेत आहे. हे पैसे बँकेतून वर्षातून एकदाच घेतले जातात. बँकेने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा – CBSE Board Exams 2023 : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा कधीपासून? रोल नंबर कसा मिळेल? जाणून घ्या!
१८% वस्तू आणि सेवा कर (GST)
हे पैसे बँकेकडून शुल्क म्हणून कापले जातात. त्याच वेळी, बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डसाठी, ग्राहकांकडून वार्षिक १२५ रुपये वसूल केले जातात. १८ टक्के दराने जीएसटी जोडला जातो, त्यानंतर ही रक्कम १४७.५० रुपये होते.
कार्ड बदलूनही भरावे लागतात पैसे
याशिवाय जर कोणत्याही ग्राहकाला त्याचे डेबिट कार्ड बदलायचे असेल तर त्यासाठी त्याला जीएसटी शुल्कासह बँकेला ३०० रुपये भरावे लागतील.