Vijay Khandare Daru Dosti Hindi Song : गेल्या वर्षी ‘पुष्पा’ सिनेमा आणि त्याच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यानं देशभरात धूमाकूळ घातला. श्रीवल्लीचे अनेक रिमेक आणि नव्या भाषेतील अवतार पुढे येऊ लागले, परंतु प्रेक्षकांनी दखल घेतली ती विजय खंडारेच्या मराठमोळ्या श्रीवल्लीची. या गाण्याला युट्यूबर अमाप प्रेम लाभलं. दोन कोटीहून अधिक वेळा लोकांकडून हे गाणं वारंवार पाहिलं गेलं.
श्रीवल्ली नंतर विजयने आता थेट हिंदी गाण्यामध्ये पदार्पण केलं आहे. ‘दारू-दोस्ती’ नाव असेलेलं नवं कोरं हिंदी गाणं युवकांना ठेका धरायला भाग पाडेल, असा विश्वासही विजयने व्यक्त केला आहे. ‘दारू-दोस्ती’ हे गाणं रविवारी ११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता TFC TAMASHA FILM CAFE या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा – गॅल सिलिंडरचा असतो विमा..! अपघात झाल्यास मिळतात ५० लाख; ‘असा’ करा क्लेम!
हैदराबादमध्ये गाण्याचं चित्रण
पुर्णपणे हैदराबाद शहरात चित्रित झालेलं हे गाणं सौरभ नागमोते या तरुण दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलं आहे. त्याचबरोबर देशातील विविध राज्यातील कलावंत आणि टेक्निशियन्सनी सोबत येऊन या गाण्याची निर्मिती केली आहे. अमरावती, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गीतकार व अभिनेते चंद्रशेखर तरारे यांनी हे गाणं लिहिलं असून त्यांनी गाण्यात अभिनयही केला आहे. या गाण्यात सहकलाकार म्हणून बिहारचा सौरव सिंग आणि मध्य प्रदेशची शगुफ्ता अहमद आहेत.
गाण्याच्या चित्रिकरणाची जबाबदारी रांचीच्या अमन कुमारने सांभाळली असून प्रॉडक्शन मॅनेजमेंट पश्चिम बंगालचा ऋषभ गुप्ता आणि ओडिशाचा निलेश मोहंती यांनी केलं आहे.’दारू-दोस्ती’ हे गाणं चेतन ठाकूर यांनी संगितबद्ध केलं असून संचित पांचाळे आणि चेतन ठाकूर यांनी गाणं गायलं आहे.