गुहेत सापडला 5600 वर्ष जुना ‘अंडरवॉटर’ पूल..!

WhatsApp Group

Underwater 5600-Year-Old Bridge Inside A Cave : मालोर्का हे स्पेनमधील एक बेट आहे. येथे एका गुहेत पाण्यात बुडालेला पूल सापडला आहे. हा पूल 5600 वर्ष जुना आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. सर्वप्रथम, त्या वेळी या गुहेत मानव राहत होता. किंवा त्यांचे येणे-जाणे होते. दुसरे म्हणजे, तापमान हळूहळू वाढले. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत राहिली आणि ही जागा पाण्यात बुडाली.

भविष्यात अशी अनेक शहरे अशा प्रकारे बुडतील. सध्या या गुहा आणि पुलाबद्दल जाणून घेऊ. 2000 मध्ये या गुहेचा शोध लागला होता. यानंतर शास्त्रज्ञांना ती पाण्यानी भरलेले दिसली. स्कुबा डायव्हिंग करून पाण्याखालील पूल शोधला. ही गुहा भूमध्य समुद्राजवळ आहे. त्यात चुनखडीचा 25 फूट लांबीचा पूल आहे.

पूर्वी हा पूल 4400 वर्षे जुने असल्याचा अंदाज होता. दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ बोगदान ओनाक यांनी सांगितले की, मागील अभ्यासात दिलेले वय या पुलाच्या आजूबाजूला सापडलेल्या मातीच्या तुकड्यांनुसार होते. पण आता आपल्याला त्याचे नेमके वय माहित आहे. या गुहेत एका खास शेळीची हाडे सापडली आहेत.

हेही वाचा – VIDEO : भाजप आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल! मुस्लिमांना खुलेआम धमकी; म्हणाले…

पुलाजवळ शेळी-मृग मायोट्रागस बॅलेरिकसची हाडे सापडली आहेत. जी आता नामशेष झाली आहे. ही गुहा मानवाने कधी व्यापली हे माहीत नाही. कारण मालोर्का हे खूप मोठे बेट आहे. भूमध्य समुद्रात मानवाने फार पूर्वीपासून राहण्यास सुरुवात केली.

शेळीची हाडे आणि पुलावरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अभ्यास केला असता गोंधळ उडाला आहे. कारण समुद्राच्या आत पडलेल्या वस्तूंवर वेगवेगळ्या रंगांचा थर जमा होतो. ज्याला कॅल्साइट इन्क्रस्टेशन म्हणतात. म्हणजे कॅल्शियमचा एक प्रकार. त्याची चौकशी केली असता नेमकी वेळ समोर आली.

सुमारे 5600 वर्षांपूर्वी या गुहेच्या आत हा पूल बांधण्यात आला होता. जेणेकरून पूर्व भूमध्य आणि पश्चिम भूमध्य समुद्र यांच्यातील अंतर बंद करता येईल. त्या काळातील लोक या गुहेतून समुद्राच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात असत.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment