अभिनेता होण्यासाठी घर सोडलं आणि यश जगासाठी ‘रॉकी भाई’ झाला!

WhatsApp Group

South Superstar Yash : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार यश आज जगभरात ‘रॉकी भाई’ म्हणून प्रसिद्ध आहे. लोक आता ‘KGF 3’ च्या रिलीजची वाट पाहत आहेत, पण ‘KGF’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याला 5 हिट चित्रपटांमुळे स्टार दर्जा मिळाला. तो एका बस ड्रायव्हरचा मुलगा आहे, ज्याने लहानपणापासून अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते.

‘KGF’ आणि ‘KGF 2’ च्या यशानंतर अभिनेता यशला जगभरात ओळख मिळाली, तो कन्नड चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. KGF च्या रिलीजपूर्वी त्याने अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले होते आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते, परंतु त्याच्या प्रचंड यशामागील त्याचा कठोर संघर्ष फार कमी लोकांना माहीत आहे. तो एका बस ड्रायव्हरचा मुलगा आहे, पण त्याची मोठी स्वप्ने आहेत. कर्नाटकातील एका छोटय़ाशा गावातून तो बाहेर पडला आणि अभिनयविश्वाचा बादशाह बनला.

यशच्या आई-वडिलांना त्याच्या स्वप्नांचा आदर होता, पण त्याने आपले शिक्षण पूर्ण करावे अशी इच्छा होती. मात्र, यशने अभिनेता होण्यासाठी घर सोडले. यश निराश होऊन एक-दोन आठवड्यांनी परत येईल, असे त्याच्या वडिलांना वाटत होते, पण तसे झाले नाही. अभिनेता यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत हे जाणून दिग्दर्शक एसएस राजामौली यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी गेल्या वर्षी मुलाखतीत सांगितले होते की, “‘मला हे जाणून आश्चर्य वाटले की यशचे वडीसल एक बस ड्रायव्हर आहेत. मला सांगण्यात आले की त्याचे वडील अजूनही बस ड्रायव्हर आहेत. माझ्यासाठी अभिनेत्याचे वडील हेच खरे स्टार आहेत.”

हेही वाचा – अभिमानाचा दिवस..! ‘या’ तारखेला मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण

जगभरातील लोक त्याला यश नावाने ओळखतात, पण त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. तो चाहत्यांमध्ये ‘रॉकिंग स्टार’ या नावानेही प्रसिद्ध आहे. तो कन्नड सिनेमातील सर्वात महागडा स्टार आहे. आज त्याच्याकडे प्रसिद्धीसोबतच संपत्तीही खूप आहे.

यशने 2007 मध्ये ‘जंबडा हुडुगी’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. 2008 मध्ये आलेल्या ‘रॉकी’ चित्रपटात तो पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर त्याला ‘मोडलासाला’ या चित्रपटात काम मिळाले, ज्याने त्याचे नशीब बदलले. 2010 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट हिट ठरला होता. मग मागे वळून पाहण्याची गरज नव्हती. त्याला चित्रपटांची ओढ लागली.

यश नंतर ‘मास्टर पीस’, ‘गजकेसरी’, ‘मिस्टर अँड मिसेस रामचारी’ आणि ‘राजा हुली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले. यश पुन्हा 2018 मध्ये KGF या चित्रपटात दिसला, ज्याने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. KGF 2 रिलीज झाल्यानंतर तो जागतिक स्टार बनला. प्रेक्षक आता त्याच्या KGF 3 च्या रिलीजची वाट पाहत आहेत. 37 वर्षीय यशने 9 डिसेंबर 2016 रोजी राधिका पंडितशी लग्न केले, त्यांना गोंडस सुंदर मुले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment