तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला..! साऊथच्या नटीचं फिल्ममेकरसोबत लग्न; पाहा चर्चेतले PHOTO

WhatsApp Group

Mahalakshmi and Ravinder Chandrasekar Marriage : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांनी गुरुवारी साऊथ अभिनेत्री आणि व्हीजे महालक्ष्मीशी लग्न केलं. रवींद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी या दोघांचं हे दुसरं लग्न आहे. लग्नात कुटुंबातील सदस्य आणि काही मित्र उपस्थित होते. दोघांचे चाहते अभिनंदन करत आहेत. इंस्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर करत महालक्ष्मीनं लिहिलं, “मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहेस. तुझ्या प्रेमानं माझ्या आयुष्यात एक वेगळा रंग भरला आहे. मी तुला खूप प्रेम आणि नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा देते.”

रवींद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोक फोटोवर सकारात्मक तर काही नकारात्मक कमेंट करत आहेत. काही लोक रवींद्र चंद्रशेखरन यांना त्यांच्या लठ्ठपणामुळे ट्रोल करत आहेत. मात्र, हे जोडपं लग्नामुळे खूप आनंदी असून त्यांचा आनंद फोटोत पाहायला मिळत आहे. महालक्ष्मीनं लग्नात परिधान केलेल्या साडीचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. महालक्ष्मीनं लग्नात पारंपरिक साडी नेसली होती.

हेही वाचा – VIDEO : सर्फिंग, बोटिंग आणि..! समुद्रकिनारी भारतीय क्रिकेटपटूंची धमाल; द्रविडनं आखला प्लान!

महालक्ष्मीची साडी..

तमिळ लग्नात वधू-वरांचा पोशाख खूप खास असतो. तमिळ वधू भारतीय संस्कृतीनुसार लाल रंगाच्या साड्या परिधान करतात. वधू सामान्यतः लांब कांजीवरम साडी परिधान करतात. महालक्ष्मीच्या साडीवर चमकदार रंगांची नक्षी आहे. कुटुंब धनवान असेल तर काही वेळा साडीवर सोन्याचं नक्षीकाम केलं जातं. वधूच्या केसात अंबाडा बनवला जातो आणि त्याला फुलं आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. महालक्ष्मीनं तिचे केस लाल फुलांनी आणि गजऱ्यानं सजवले होते. महालक्ष्मीनं तिच्या लग्नासाठी खास लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती.

रवींद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मीचा विवाह अगदी जवळच्या लोकांमध्ये एका खासगी समारंभात झाला. समोर आलेल्या फोटोंमध्ये, महालक्ष्मी तिचा पती रवींद्रचा हात धरताना दिसत होती. यादरम्यान दोघेही एकमेकांना लाईफ पार्टनर म्हणून मिळाल्यानं खूप आनंदी दिसत होते. महालक्ष्मीचे हे दुसरं लग्न असून यापूर्वी तिचं लग्न अनिल नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. अनिलपासून महालक्ष्मीला एक मुलगाही आहे.

हेही वाचा – किती क्युट फोटो आहे..! आजोबांनी कडेवर घेतलेल्या या पोराला ओळखलं का?

महालक्ष्मीनं ‘वाणी राणी’, ‘चेल्लामय’, ‘ऑफिस’, ‘अरासी’, ‘थिरु मंगलम’, ‘यामिरुक्का बायमेन’ आणि केलाडी कनमनी या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर रवींद्र चंद्रशेखरन यांनी त्यांच्या लिब्रा प्रॉडक्शन्स बॅनरखाली ‘नलानम नंदिनीयम’, ‘सुट्टा कढाई’, ‘नटपुना एन्नानु थेरयुमा’ आणि ‘मुरुंगाकाई चिप्स’ यांची निर्मिती केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment