Thalapathy Vijay On CAA | मोदी सरकारने तीन शेजारील देशांतील निर्वासितांना नागरिकत्व देणारा CAA हा कायदा लागू केला आहे. एकीकडे कायद्याच्या अंमलबजावणीचा आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे विरोधी पक्ष मोदी सरकारला कोंडीत पकडण्यात कमी पडत आहेत. नुकताच स्वत:चा पक्ष सुरू करून राजकारणात प्रवेश केलेला दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर एक विधान जारी करताना विजय म्हणाला, सीएएची अंमलबजावणी स्वीकारली जाऊ शकत नाही.
विजय म्हणाला, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 सारखा कोणताही कायदा देशात खपवून घेतला जाऊ शकत नाही. देशातील सर्व जनता बंधुभावाने एकत्र राहण्यास तयार असताना अशा कायद्याची काय गरज आहे. तमिळनाडू सरकारने हा कायदा राज्यात लागू करू नये. वाजय व्यतिरिक्त अनेक विरोधी नेत्यांनी यावेळी CAA च्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयआयएमने म्हटले आहे की, मोदी सरकार निवडणुकीच्या आधी हा स्टंट निवडणूक फायदा मिळवण्यासाठी करत आहे. निवडणुकीपूर्वी सीएए लागू करणे हा ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी याला विभाजनाचे राजकारण म्हटले आहे. ते म्हणाले, जनता भाजपला धडा शिकवेल. CAA विरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्या राज्यात CAA लागू होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा – Cabinet Decision : धनगर समाजास नवी मुंबईला भूखंड, घाटकोपरला अण्णा भाऊ साठेंचे आंतरराष्ट्रीय स्मारक
ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजय यांनी म्हटले आहे की ते त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये CAA लागू होऊ देणार नाहीत. विजय म्हणाले की, हा धर्माच्या आधारावर विभागणी करणारा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी कोणत्याही किंमतीवर होऊ शकत नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्र सरकार मजबूत असते तर या कायद्याची आधी अंमलबजावणी केली असती. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच त्याची अंमलबजावणी का केली जात आहे? त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चार वर्षे का लागली? निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते का?
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!