Sonali Phogat Murder : सगळं ठरवूनच केलं..! पीए सांगवानचा हत्येप्रकरणी खुलासा; म्हणाला, “गोव्यात कुठलीही…”

WhatsApp Group

Sonali Phogat Murder Case : हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान यानं दिल्याची माहिती गोवा पोलीस सूत्रांनी दिली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोनाली फोगट यांना गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सांगवाननं दिल्याचा दावा केला आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लान नव्हता, गोव्यात आणण्याचा हा कट होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

गोवा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट यांच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोवा पोलिसांनी पुष्टी केली आहे, की सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि खून प्रकरणात सुधीर सांगवानला दोषी ठरविण्यासाठी हे पुरेसे आहेत.

हेही वाचा – “यंदा दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी पण…”; नारायण राणेंच्या ‘थेट’ वक्तव्यामुळं वाद वाढणार?

गोवा पोलीस आज आरोपी सुधीर सांगवानच्या रोहतक येथील घरीही जाऊ शकतात असं वृत्त आहे. यादरम्यान सुधीर सांगवान यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाऊ शकते. याशिवाय सुधीरच्या घराचीही झडती घेता येईल. सोनाली फोगटचे भाऊ वतन ढाका आणि रिंकू ढाका यांनी सांगितलं की, त्यांचे गोवा पोलिसांशी बोलणं झालं असून त्यांनी आज रोहतक येथील सुधीर सांगवान यांच्या घरी चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती दिली आहे. गोवा पोलीस फक्त हिसारमध्ये हजर आहेत. सुधीर सांगवान यांच्या घरी जाऊन गोवा पोलीस आज आणखी काही लोकांचे जबाब नोंदवू शकतात. सध्या गोवा पोलीस लाल डायरीचा तपास करत आहेत.

हेही वाचा – Asia Cup 2022 : हाँगकाँगच्या टीमवर हसताय? त्यांचा स्ट्रगल वाचून डोळ्यात पाणी येईल! कुणी डिलिव्हरी बॉय, तर कुणी…

सोनाली फोगट यांचा संशयास्पद मृत्यू

२३ ऑगस्ट रोजी गोव्यात सोनाली फोगट यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सोनाली फोगट यांच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी नंतर कुर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स आणि दोन ड्रग्ज तस्करांनाही अटक केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment