“त्याने वर्षानुवर्षे माझ्यावर शारिरीक…”, EX गर्लफ्रेंडचा सलमान खानवर ‘गंभीर’ आरोप; फोटोमुळे सर्वत्र खळबळ!

WhatsApp Group

Somy Ali On Salman Khan : बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीने पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोमीने सलमानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पण मग सोमीने ही पोस्ट का डिलीट केली? चला जाणून घेऊया.

सोमी अलीचा सलमानवर आरोप

अभिनेत्री असण्यासोबतच सोमी अली सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड देखील आहे. दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही, मात्र आजही दोघांच्या अफेअरची चर्चा आहे. सोमी आणि सलमान खान यांच्या नात्यात बरेच अंतर आले आहे. याच कारणामुळे सोमी अनेकदा तिच्या पोस्टमध्ये सलमान खानवर हल्ला करताना दिसत आहे. यावेळी देखील सोमी अलीने आपल्या नवीन पोस्टमध्ये दबंग खानवर अनेक आरोप केले आहेत.

हेही वाचा – Dattatreya Jayanti 2022 : यावर्षी दत्तात्रेय जयंती कधी आहे? जाणून घ्या भगवान दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला

सोमीने सलमान खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे. सोमीने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ”खूप काही घडणार आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि नंतर मला खटला भरण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस माझे रक्षण करण्यासाठी येथे ५० वकील उभे आहेत, जे मला सिगारेट जाळण्यापासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर केलेल्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील.”

सोमीने पुढे लिहिले, ”महिलांवर अत्याचार करणाऱ्या या पुरुषाचे समर्थन करणाऱ्या सर्व महिला अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे. अशा अभिनेत्यांनाही लाज वाटली पाहिजे, ज्यांनी याचे समर्थन केले. आता लढण्याची वेळ आली आहे.” सोमीची सलमानबद्दलची पोस्ट पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र त्यानंतर अभिनेत्रीने ही पोस्ट डिलीट केली. पोस्ट हटवण्याचे कारण काय, हे फक्त सोमीच सांगू शकते, पण तिच्या या पोस्टमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment