Viral Video : बिळ समजून झोपलेल्या महिलेच्या तोंडात घुसला ४ फूट साप!

WhatsApp Group

Snake Enters into Woman’s Mouth :साप पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. तुम्ही कितीही धाडसी असाल, समोर साप दिसला तर मेंदूही काही सेकंद काम करणे थांबवतो, पण एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला झोपलेली असताना तिच्या तोंडात साप घुसला होता. झोपेत असताना एखाद्याच्या केसात किंवा कपड्यात साप घुसला तरी गोष्ट पचनी पडते, पण एखादा साप कोणाच्या तोंडात गेला आणि त्याला ते कळतही नाही, ही गोष्ट थोडी विचित्र वाटते. असाच प्रकार एका महिलेसोबत झाला असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही महिला गाढ झोपेत होती आणि तिला बिळ समजून एक मोठा साप तिच्या तोंडात शिरला याची तिला जाणीवही नव्हती. ही बातमी कळताच डॉक्टरांनी सापाला मेहनत करून बाहेर काढले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला बेशुद्ध पडली असून डॉक्टर तिच्या तोंडात एक विशेष काठी टाकून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हळूहळू डॉक्टरांनी महिलेच्या तोंडातून साप बाहेर काढला.

हेही वाचा – IPL 2023 : मराठमोळा शार्दुल ठाकूर आता ‘या’ टीमकडून खेळणार!

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @FascinateFlix नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे की झोपेत असताना ४ फूट लांब साप महिलेच्या तोंडात घुसला, त्याला बाहेर काढण्यात आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment