Snake Video : कधीकधी अशी घटना काही लोकांसोबत घडते, ज्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण असतं. मात्र, लोकांनी हा व्हिडिओ पाहिला नसता तर सापही कोणाच्या कानात शिरू शकतो यावर विश्वास ठेवण्यास त्यांनी नकार दिला असता. होय, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीच्या कानात साप घुसला आहे. मुलीला सापाची माहिती मिळताच ती घाबरली आणि लगेच डॉक्टरांकडं धावली. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल, कारण कानात घुसलेला छोटा साप खूपच धोकादायक दिसत होता.
चिमट्यानं सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न
फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिची समस्या घेऊन डॉक्टरांकडं जाते. डॉक्टरांना ही घटना कळल्यावर तेही घाबरले असावेत. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. व्हिडिओमध्ये डॉक्टर मुलीला बसवून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी हातात हातमोजे घातले आहेत. लहान चिमट्यानं सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हा साप पिवळ्या रंगाचा आहे, ज्यावर पट्टे दिसत आहेत. मात्र, ही घटना कुठली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा – VIDEO : फक्त १००० रुपयांसाठी अॅम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांचं ‘गर्भवती’ महिलेसोबत संतापजनक कृत्य!
कुणी शेअर केलाय व्हिडिओ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती मुलगी शांत बसली असून डॉक्टर साप काढण्याचं काम पूर्ण करत असल्याचंही दिसून येतं. काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पटना येथील रहिवासी चंदन कुमार यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ‘साप कानात गेलाय’ असं कॅप्शनमध्ये दिलं आहे. या व्हिडिओत साप अनेकदा तोंड उघडताना दिसत आहेत. डॉक्टरांनी साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच त्या मुलीा खूप वेदना झाल्याची प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसून येते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून सगळेजण थक्क झाले आहेत.