VIDEO : सर्वात छोटा देश, फक्त 35 लोक आणि 4 कुत्रे, सिक्युरिटीशिवाय फिरतात राष्ट्रपती!

WhatsApp Group

Smallest Country Republic of Molossia : आपल्या भारतात, कोणत्याही मंत्र्याचा ताफा निघाला की, पोलिसांच्या गाड्याही त्यांच्या मागे जातात. शहरातील रस्ते मोकळे करतात, जेणेकरून सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा ‘देशा’बद्दल सांगणार आहोत, जिथे राष्ट्रपती रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतील. इतकेच नाही तर ते आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला ओळखतात आणि एकमेकांना भेटतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु या देशाची एकूण लोकसंख्या 39 आहे, ज्यामध्ये 35 लोक आणि 4 कुत्रे आहेत. या देशाचे नाव मोलोसिया आहे, जो एक मायक्रोनेशन आहे.

अमेरिकेतील नेवाडा येथे असलेल्या या देशाचे स्वतःचे वेगळे कायदे, परंपरा आणि स्वतःचे चलन आहे. 1977 मध्ये केविन बाघ आणि त्यांच्या एका मित्राला वेगळा देश बनवण्याची कल्पना होती. अशा परिस्थितीत या दोघांनी मिळून मोलोसिया हे मायक्रॉनेशन म्हणून प्रस्थापित केले. तेव्हापासून आत्तापर्यंत केविन हे या छोट्या देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतःला तिथे हुकूमशहा घोषित केले आहे, तर त्यांच्या पत्नीला मोलोसियाच्या फर्स्ट लेडीचा दर्जा मिळाला आहे.

केविन यांचा मित्र ज्याच्या सोबत त्यांनी मायक्रोनेशन मोलोसिया स्थापन करण्याची कल्पना मांडली होती, त्यांनी थोड्या वेळाने ही कल्पना सोडून दिली. पण ही कल्पना केविन यांच्या मनात अडकली आणि त्यांनी आपला प्रयत्न सुरू ठेवला. येथे राहणारे बहुतांश नागरिक या देशाच्या सीमेजवळ राहणारे केविन यांचे ​​नातेवाईक आहेत. मात्र या देशाला अद्याप जगातील कोणत्याही सरकारकडून मान्यता मिळालेली नाही. या छोट्याशा देशात दुकाने, ग्रंथालय, स्मशानभूमी याशिवाय इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अनेक लोक या अनोख्या देशात फिरायला येत असतात. पण आत येण्यासाठी पर्यटकाला त्याच्या पासपोर्टवर शिक्का मारावा लागतो.

हेही वाचा – स्नेक प्लांट : गरमी दूर करणारी वनस्पती, घराचे तापमान करेल कमी! एकदा लावून बघाच…

गेल्या 40 वर्षांपासून केविन येथे येणाऱ्या पर्यटकांना त्याच्या छोट्या देशाच्या फेरफटका मारत आहेत. हा दौरा एकूण 2 तास चालतो. असे मनमिळाऊ हुकूमशहा क्वचितच पाहायला मिळतात, असे भेटायला येणारे लोक सांगतात. मोलोसियाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या देशाचे एकूण क्षेत्रफळ 11.3 एकर आहे, ज्याची राजधानी बागस्तान आहे. तर २६ मे हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. केविन यांनी मोलोसियाला स्वतंत्र देश घोषित केले असले तरीही तो अजूनही अमेरिकेचा एक भाग आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment