Pakistan Air Pollution : पाकिस्तानातील लाहोर शहरात प्रदूषणामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. लाहोर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. काळ्या रंगाचे विषारी धुके शहरभर पसरले असून त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. लाहोरमधील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 1900 च्या पुढे गेला आहे. अहवालानुसार, पाकिस्तानमधील सुमारे 15,000 रूग्णांना दमा, श्वास घेण्यास त्रास आणि इतर श्वसन समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लाहोरमधील परिस्थिती पाहून आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे ते म्हणाले. सरकारने प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत ओळखून त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण आणले पाहिजे. याशिवाय त्यांनी लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्याबाबत सांगितले आणि खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलण्याबाबतही मत दिले
लाहोरमधील या प्रदूषित वातावरणाची मुख्य कारणे वाहनांचे उत्सर्जन, बांधकाम स्थळांवरून उडणारी धूळ आणि औद्योगिक प्रदूषण असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी लोकांना मास्क घालण्याचा, घरातच राहण्याचा आणि एअर प्युरिफायर वापरण्याचा सल्ला दिला आहे.
अहवालानुसार, लाहोरमधील रुग्णालयांमध्ये श्वास घेण्यात अडचण, कोरडा खोकला, न्यूमोनिया आणि हृदयविकाराच्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची गर्दी आहे. पाकिस्तानच्या सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्याअंतर्गत मेयो रुग्णालयात 4 हजारांहून अधिक रुग्ण, जिना रुग्णालयात 3500 हून अधिक रुग्ण, गंगाराम रुग्णालयात 3 हजाराहून अधिक रुग्ण आणि बाल रुग्णालयात 2 हजाराहून अधिक रुग्ण दाखल आहेत.
या धोकादायक वातावरणात लहान मुले आणि हृदयविकाराच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचा इशारा पाकिस्तानचे वैद्यकीय तज्ज्ञ अश्रफ झिया यांनी दिला आहे. ते म्हणाले की पंजाबच्या काही भागात 10 नोव्हेंबर रोजी AQI 1900 पेक्षा जास्त नोंदवण्यात आला होता. मात्र, 12 नोव्हेंबर रोजी 604 एवढी नोंद झाली.
वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!