मायग्रेन टाळण्यासाठी 3 सोपे घरगुती उपाय, एकदा करुन पाहाच!

WhatsApp Group

Migraine Treatment : अनेक वेळा जेव्हा आपण सतत काम करतो तेव्हा तणावाची पातळी वाढते. त्यामुळे तीव्र वेदना जाणवतात. डोकेदुखी ही सामान्य समस्या मानली जात असली तरी काहीवेळा हे मायग्रेनचे लक्षण देखील असू शकते. मायग्रेनच्या बाबतीत, डोक्याच्या विशिष्ट भागात वेदना होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, मायग्रेनची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे उलट्या होणे किंवा चक्कर येणे. मायग्रेनमुळे व्यक्ती कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आहारतज्ज्ञ सांगतात की, काही वेळा शरीरातील हार्मोनल बदलांमुळेही मायग्रेन होऊ शकतो. मायग्रेनच्या वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करता येऊ शकतो.

त्रिफळाचे सेवन

आवळा, बहेडा आणि हिरडा – या तीन गोष्टी त्रिफळामध्ये समाविष्ट आहेत. हे खाल्ल्याने मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो. त्रिफळाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. यासोबतच ते पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत खाऊ शकता.

ब्राह्मी चहा

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ब्राह्मी देखील खूप फायदेशीर ठरते. तसेच पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. जर मायग्रेनचा त्रास तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर तुम्ही रात्री ब्राह्मी चहा पिऊ शकता.

हेही वाचा – सतत Overthinking करताय? कसं थांबवाल? काय करता येईल? हे 10 सोपे मार्ग वाचा!

नारळ पाणी

नारळाचे पाणी हार्मोनल बदलांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यासोबतच डिहायड्रेशनची समस्याही कमी होते. आठवड्यातून किमान तीन वेळा नारळ पाणी प्यायल्यास मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment