Karnataka CM : ठरलं एकदाचं..! कर्नाटकात सिद्धरामय्या मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

WhatsApp Group

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण असणार, याचा खुलासा झाला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस पक्षाने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे एकमेव उपमुख्यमंत्री असतील. वेणुगोपाल म्हणाले, ”शिवकुमार संसदीय निवडणुका संपेपर्यंत पीसीसी अध्यक्षपदी कायम राहतील. 20 मे रोजी शपथविधी सोहळा होणार असून, त्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा एक गटही शपथ घेणार आहे.”

खरगे यांचे ट्वीट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, ”टीम काँग्रेस कर्नाटकच्या लोकांच्या प्रगती, कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध आहे. आम्ही 6.5 कोटी कन्नडिगांना दिलेल्या 5 हमींची अंमलबजावणी करू.”

कर्नाटकात ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. बऱ्याच दिवसांच्या बैठका आणि बैठकांनंतर ही घोषणा करण्यात आली. मात्र, काँग्रेसने निवडणूक जिंकल्यास मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्य लढत होणार हे आधीच निश्चित झाले होते.

हेही वाचा – Indian Railways : तुम्हाला माहितीये…DEMU, EMU आणि MEMU ट्रेनमधील फरक? जाणून घ्या!

लोकप्रियतेत सिद्धरामय्या पुढे

डीके शिवकुमार यांना काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार मानले जात असले तरी लोकप्रियतेच्या बाबतीत सिद्धरामय्या आघाडीवर असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय शिवकुमार यांच्यावर दाखल झालेले गुन्हेही त्यांच्यात आणि मुख्यमंत्रीपदात आले होते.

कर्नाटकच्या 224 सदस्यीय विधानसभेसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा मिळवून मोठा विजय मिळवला, तर सत्ताधारी भाजपला 66 आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना 19 जागा मिळाल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment