सारा तेंडुलकर नाही, सारा अली खानसोबत फिरतोय शुबमन गिल? VIDEO व्हायरल!

WhatsApp Group

Shubman Gill and Sara Ali Khan : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटर शुबमन गिल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. गिलचं नाव आधी सारा तेंडुलकरशी (Rumoured Girlfriend) जोडलं गेलं होतं. दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत होते, मात्र काही दिवसांपूर्वी दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये येत होत्या.

लंडन की दुबई?

व्हायरल झालेला व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे, ज्यामध्ये क्रिकेटर शुबमन गिल आणि अभिनेत्री सारा अली खान टेबलावर बसले असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. बॉलीवूड सेलेब्स आणि क्रिकेटर्सचे कनेक्शन नवीन नाही, क्रिकेटर्स बॉलीवूड अभिनेत्रींना डेट करतात याचा प्रभाव दिसून येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन सध्या लंडनमध्ये आहे, जिथे तो बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसत होते. व्हायरल झालेला फोटो दुबईचा आहे, मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये याला लंडनचा फोटो म्हटले जात आहे.

हेही वाचा – अभिनेता KRK उर्फ कमाल खानला अटक; मुंबई पोलिसांनी विमानतळावरून घेतलं ताब्यात!

शुबमन गिल किंवा सारा तेंडुलकर या दोघांनीही या नात्याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१९ च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. शुबमन आयपीएल २०१९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळला. या हंगामानंतर त्यानं ‘रेंज रोव्हर’ कार खरेदी केली. त्यानंतर त्यानं नवीन कारसोबतचे त्याचे काही फोटो शेअर केले. त्यावर सारानंही कमेंट केली होती. सारानं जाहिरात क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं कपड्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला आणि ती आता २५ वर्षांची आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर असलेला शुबमन गिलचा नुकताच झालेला झिम्बाब्वे दौरा बऱ्यापैकी यशस्वी ठरला. त्या दौऱ्यावर त्यानं वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या कामगिरीच्या जोरावर झिम्बाब्वे दौऱ्यावर तो ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरला आणि या दौऱ्यावर सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडण्यात त्याला यश आलं. त्यानं भारताकडून आतापर्यंत ११ कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि गेल्या सहा वनडे सामन्यांमध्ये त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. वृत्तानुसार, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर गिल आता काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment