Video : शिवसेना नेत्यावर भरदिवसा गोळीबार! मंदिराबाहेर निदर्शन सुरू असताना…

WhatsApp Group

Shivsena Leader Sudhir Suri Shot : पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर पंजाबमधील अमृतसरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. अमृतसरमधील मजिठा रोडवरील गोपाल मंदिराबाहेर ही घटना घडली, ज्यामध्ये सुरी यांना दोन गोळ्या लागल्या. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शिवसेनेच्या नेत्यांची गोपाळ मंदिराबाहेर निदर्शने सुरू असताना सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. त्याचवेळी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या संशयिताला अटक करून त्याच्याकडून शस्त्र जप्त केले आहे. संदीप असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

‘या’ गोष्टीचा करत होते सुरी विरोध

कचऱ्यात देवाची मूर्ती सापडल्यानंतर गोपाळ मंदिराबाहेर सुधीर सुरी धरणे देत होते. यादरम्यान कोणीतरी गर्दीचा फायदा घेत त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरी यांना घेऊन रुग्णालयात धाव घेतली मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा –  Video : पंढरपुरात फडणवीसांनी रचला ‘नवा’ रेकॉर्ड! वारकऱ्यांसोबत फुगडीही खेळली आणि…

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment