Hyundai Motor India’s IPO : भारतातील सर्वात मोठा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे कारण बाजार नियामक सेबीने ह्युंदाई मोटर इंडियाच्या Rs 25,000 कोटी ऑफर-फॉर-सेलच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. आयपीओ ऑक्टोबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईचा आगामी आयपीओ एलआयसीच्या $2.7 बिलियनच्या सूचीचा विक्रम मोडू शकतो. आत्तापर्यंत शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ एलआयसीचा होता, जो 21,008 कोटी रुपयांचा आयपीओ होता.
एलआयसीनंतर, वन97 (पेटीएमची मूळ कंपनी) चा 18,300 कोटी रुपयांचा आयपीओ आला. पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर 2021 मध्ये बाजारात आला. याशिवाय, कोल इंडियाचा 15,199 कोटी रुपयांचा आयपीओ नोव्हेंबर 2010 मध्ये आला होता आणि रिलायन्स पॉवरचा 11,563 कोटी रुपयांचा आयपीओ फेब्रुवारी 2008 मध्ये आला होता. ह्युंदाईच्या कोरियन मूळ कंपनीकडून ह्युंदाई इंडियाच्या आयपीओ साठी विक्रीची ऑफर असेल. कंपनीकडून कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत.
हेही वाचा – महिनाभर रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यास काय होईल माहितीये?
मारुतीचे सर्वाधिक मार्केट कॅप 4 लाख कोटी रुपये
ऑफरद्वारे कंपनीने सुमारे 17% इक्विटी कमी करणे अपेक्षित आहे. 17% स्टेकसाठी अंदाजे $3 अब्ज ऑफर कंपनीचे मूल्य अंदाजे $18 अब्ज असेल अशी अपेक्षा आहे. सध्या देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीची मार्केट कॅप सुमारे 4 लाख कोटी रुपये आहे. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा 3.8 लाख कोटींवर आणि टाटा मोटर्स 3.6 लाख कोटींवर आहे.
ह्युंदाईने आयपीओपूर्वी आपल्या विस्तार योजनांबाबत संकेत दिले आहेत. 2025 पर्यंत देशातील तिचे वार्षिक उत्पादन 10 लाख युनिट्सपर्यंत वाढवले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित करून 2025 पासून स्थानिक पातळीवर उत्पादन करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी 32,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. या पैशातून कंपनी महाराष्ट्रात नवीन कारखाना सुरू करणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी जनरल मोटर्सकडून हा कारखाना खरेदी केला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!