OMG! शाहरुख खानचा ‘जवान’ HD प्रिंटमध्ये लीक! ‘या’ साईट्सवर उपलब्ध

WhatsApp Group

Jawan Leaked Online In HD Quality : शाहरुख खान आणि नयनतारा अभिनीत आणि अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असून अनेक समक्षकांनी पाचपैकी साडेचार स्टार रेटिंग दिले आहे. ‘जवान’ पहिल्याच दिवशी बंपर कलेक्शन करू शकेल, असा दावा व्यापार विश्लेषक करत आहेत. पण या सगळ्यातर निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. जवान रिलीज झाल्यानंतर काही तासांतच तो एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान स्टारर ‘जवान’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच पायरसीचा बळी ठरला आहे. हा चित्रपट Tamilrockers, MP4Movies, VegaMovies आणि FilmyZilla सह अनेक साइटवर फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे त्याच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते, असे बोलले जात आहे.

हेही वाचा – Business : कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय कसा करायचा? वाचाल तर समजेल!

शाहरुख खानचा चित्रपट ऑनलाईन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी पठाण देखील रिलीजच्या काही तासातच पायरसीचा बळी ठरला होता. तथापि, चित्रपटाच्या ऑनलाइन लीकचा त्याच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही आणि शाहरुख खान-दीपिका पादुकोण स्टारर पठाणने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.

शाहरुख खानच्या या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक आगाऊ बुकिंग झाले आहे. आणि या चित्रपटाने प्रीसेलमध्ये 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाने बंपर कलेक्शन करण्याची पूर्ण आशा आहे. ‘जवान’च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोणचाही खास कॅमिओ आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment