कन्फर्म झालंच..! ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार शाहरुख खान; पाहा प्रोमो!

WhatsApp Group

Shah Rukh Khan in Brahmastra : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा पहिला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र‘ ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच बरीच हवा निर्माण झाला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. आता मौनीनं आणि करण जोहरनं या चित्रपटात ‘किंग खान’ शाहरुख खानच्या कॅमिओची पुष्टी केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला हा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.

मौनीनं सांगितलं की शाहरुख ‘ब्रह्मास्त्र’मध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं म्हटलं, की ही तिच्या आत्तापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन अक्किनेनी आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम करण्याव्यतिरिक्त तिला शाहरुखच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे, जो ब्रह्मास्त्रमध्ये खास कॅमिओमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा – VIDEO : तुम्हाला माहितीये ‘ब्रम्हास्त्र’ बनवण्याची आयडिया दिग्दर्शकाला कशी सुचली?

वानरस्त्रचा व्हिडिओ

जूनमध्ये ब्रह्मास्त्रचा ट्रेलर लाँच झाल्यापासून चाहत्यांनी असा अंदाज बांधला होता, की या चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ आहे. चाहत्यांनी ट्रेलरचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. अलीकडेच शाहरुखचा ब्रह्मास्त्रमधील ‘वानरस्त्र’चा लूक ऑनलाइन लीक झाला होता. आता करण जोहरनं त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शाहरुख एक स्टंट करताना दिसत आहे. याआधी व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रक्ताने माखलेला शाहरुख गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. त्याच्या डाव्या पायातून एक सोनेरी ठिणगी निघताना दिसली. दुसर्‍या एका फोटोत, शाहरुखचे कथित वानरस्त्र पात्र हवेत उंच उंचावत असताना, भगवान हनुमानाचा चमकदार सोनेरी फोटो दिसतो.

हेही वाचा – “मला गोमांस खायला आवडतं”, ब्रम्हास्त्र रिलीज होण्यापूर्वी रणबीर कपूरचा VIDEO चर्चेत!

५०० कोटीचं बजेट

क्लिप शेअर करताना करणनं लिहिलं की, “वानरस्त्रची विलक्षण शक्ती अवघ्या आठ दिवसात उलगडेल!” या क्लिपमध्ये वानरस्त्र धावताना आणि भिंतीवर उडी मारताना, प्रतिस्पर्ध्यावर आगीचा गोळा उडवताना दिसतो. नव्या युगातील नवोदितांना डोळ्यासमोर ठेवून या चित्रपटात तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्यात आला आहे. चित्रपटाच्या बजेटचा सर्वात मोठा भाग त्याच्या व्हीएफएक्सवर खर्च करण्यात आला आहे. निर्मात्यांनुसार या चित्रपटाचं बजेट जवळपास ५०० कोटी आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोना महामारीमुळं त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि चित्रपटाचं बजेट वाढतच गेलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment