LIC Scheme : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) सर्व वयोगटातील लोकांना लक्षात घेऊन योजना सुरू करते. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल माहिती देत आहोत. त्यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पैशाची चिंता करावी लागणार नाही. LIC ची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme) ही एकच प्रीमियम योजना आहे. सरल पेन्शन पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम फक्त एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर एक निश्चित पेन्शनची रक्कम मिळत राहील.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पेन्शनसाठी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची वाट पाहण्याचीही गरज नाही. या पॉलिसीमध्ये वयाच्या ४० व्या वर्षीच तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळू लागतो. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांतून एकदा पेन्शन घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…
हेही वाचा – IPL 2023 : डेव्हिड वॉर्नरला 12 लाखांचा तर विराट कोहलीला 24 लाखांचा दंड..! ‘हे’ आहे कारण
दोन पर्याय मिळतील
ही योजना घेण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिली म्हणजे सिंगल लाईफ ज्यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर असेल. त्याच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला मूळ प्रीमियमची रक्कम दिली जाईल. दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवन. यामध्ये दोन्ही पती-पत्नींचा अंतर्भाव होतो. प्रथम प्राथमिक पेन्शनधारकाला पेन्शन मिळेल आणि त्याच्या मृत्यूनंतर पेन्शन त्याच्या जोडीदाराला दिली जाईल. जर ते दोघे मरण पावले, तर त्यांच्या मृत्यूनंतर, मूळ प्रीमियमची रक्कम त्यांच्या नॉमिनीला प्राप्त होईल.
कोणाला किती पेन्शन मिळेल?
किमान 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे वयाच्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला दरमहा किमान 1,000 रुपये किंवा वार्षिक 12,000 रुपये पेन्शन घ्यावे लागेल. यासाठी तुम्हाला अडीच लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये जास्तीत जास्त पेन्शन घेण्यावर मर्यादा नाही. 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम भरून तुम्हाला दरवर्षी 50250 रुपये पेन्शन मिळू शकते. लक्षात ठेवा की तुम्ही येथे 40 वर्षांचे असणे आवश्यक आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!