आधार, पॅन कार्डवरील QR कोड काय सांगतो? त्यात कोणती माहिती असते?

WhatsApp Group

Aadhaar Pan Card QR Code : आजकाल छोट्या दुकानांपासून ते सरकारी कागदपत्रांपर्यंत एक गोष्ट कॉमन झाली आहे आणि ती म्हणजे QR कोड. QR कोड स्कॅन करून पेमेंट केले जात आहे आणि याद्वारे सर्व माहिती एकाच स्कॅनने कळू शकते. तुम्ही पाहिलेच असेल की आता पॅन कार्ड आणि आधार कार्डवर QR कोड बनवला जातो आणि तो सर्व कागदपत्रांमध्ये वेगळा असतो. पॅन कार्ड आणि आधार कार्डवर छापलेल्या QR कोडमध्ये काय विशेष आहे आणि तो स्कॅन केल्यावर कोणत्या प्रकारची माहिती कळते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

पॅन कार्ड

तुमच्या कमाईशी संबंधित सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज, QR कार्ड देखील पॅन कार्डवर छापलेले असते. जेव्हा जेव्हा पॅन कार्डचा QR कोड स्कॅन केला जातो तेव्हा तो तुम्हाला पॅन कार्ड धारकाबद्दल अनेक तपशील देतो. या माहितीमध्ये पॅनकार्डधारकाचा फोटो आणि सही महत्त्वाची आहे. यासोबतच स्कॅनिंग करताना पॅन, नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती मिळते. जर पॅनकार्ड एखाद्या कंपनीच्या नावावर असेल तर या QR कोडद्वारे कंपनीबद्दल काही माहिती मिळू शकते.

हेही वाचा – आईंग…हे काय! जुन्या ट्रेनचं इंजिन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला खेचतंय; पाहा Video

आधार कार्ड 

आता जाणून घेऊया आधार कार्डच्या QR कोडमध्ये काय दडले आहे. QR कोडमध्ये आधार क्रमांक, नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, आधार कार्डधारकाचा फोटो इत्यादी असतात आणि ते स्कॅन करून माहिती मिळवता येते. याद्वारे ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाची माहितीही समोर येऊ शकते.

कसे करता येईल स्कॅन?

QR कोड स्कॅन करण्यासाठी अनेक प्रकारचे मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत आणि त्याशिवाय तुम्ही ते तुमच्या फोनच्या QR कोड स्कॅनरद्वारे देखील स्कॅन करू शकता. ते स्कॅन केल्यानंतर, कार्डधारकाची माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment