SBI Scheme : मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च मोफत..! वाचा ‘या’ जबरदस्त स्कीमबद्दल…

WhatsApp Group

SBI Scheme : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते जेवणापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत तुमची चिंता दूर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने एक जबरदस्त स्कीम आणली आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील.

SBI ची उत्तम योजना

SBI लाइफ इन्शुरन्सने मुलांसाठी अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंतच्या खर्चाचे टेन्शन संपेल. SBI चाइल्ड प्लॅन फिक्स्ड डिपॉझिट अंतर्गत दोन योजना आहेत – पहिली एसबीआय लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स आणि दुसरी एसबीआय लाईफ – स्मार्ट स्कॉलर, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता.

हेही वाचा – Christmas Sale : तब्बल ७० % पर्यंत सूट..! Flipkart, Myntra आणि Amazon वर बंपर सेल

SBI लाइफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स

एसबीआय लाइफच्या या योजनेअंतर्गत तुम्ही १ लाख रुपये गुंतवून १ कोटी रुपये जमा करू शकता.

  • तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यात मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक गुंतवणूक करू शकता.
  • २१ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही योजना खरेदी करू शकते.
  • ही योजना खरेदी करण्यासाठी, मुलाचे वय ०-१३ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • यासाठी मुलाचा परिपक्वता कालावधी २१ वर्षे आहे.
  • मूल १८ वर्षांचे झाल्यावर ही रक्कम दरवर्षी ४ वार्षिक हप्त्यांमध्ये दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदाराला दुर्दैवी अपघात झाल्यास विमा रकमेच्या १०५ टक्के रक्कम दिली जाते.

हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ, वाचा वर्षाचा शेवटचा रविवार कसा जाईल…

SBI लाइफ – स्मार्ट स्कॉलर

एसबीआय लाइफ – स्मार्ट स्कॉलर ही एक वैयक्तिक, युनिट लिंक, नॉन-पार्टिसिपेटेड लाइफ इन्शुरन्स योजना आहे.

  • यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पालकांचे वय १८ ते ५७ वर्षे असावे. यासाठी मुलाचे वय ० ते १७ वर्षे असावे.
  • तुम्ही या पॉलिसीमध्ये ८ वर्षे ते २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
  • मुलाचा परिपक्वता कालावधी १८ ते २५ वर्षे आहे.
  • पालकांचा परिपक्वता कालावधी ६५ वर्षे आहे.
  • या योजनेत तुम्ही आणीबाणीच्या वेळी पैसे काढू शकता.
  • यामध्ये तुम्हाला अपघात विमाही दिला जातो.
  • .यामध्ये तुम्हाला टॅक्सचा फायदाही मिळतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment