SBI Home Loan EMI Calculation : जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृहकर्जाची योजना आखत असाल, तर तुम्ही व्याजदरांबाबत तपशीलवार तपासणी करावी. देशातील सर्वात मोठी बँक SBI चा गृहकर्जासाठी तिचा प्रारंभिक व्याज दर 9.15 टक्के आहे. तुम्हाला 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर तुमचा मासिक ईएमआय किती असेल आणि कर्जाच्या कालावधीत तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल हे येथील गणनेतून समजून घ्या.
SBI वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 750 किंवा त्याहून अधिक सिव्हिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना ते 9.15 टक्के प्रारंभिक दराने गृहकर्ज देत आहे. आता आपण असे गृहीत धरू की तुम्हाला 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे आहे, तर सध्याच्या प्रारंभिक व्याजदरावर तुमचा EMI किती असेल. तसेच, कर्जावरील व्याजदर संपूर्ण कार्यकाळात सरासरी सारखेच राहिले, तर तुम्ही एकूण किती व्याज द्याल?
हेही वाचा – Gold Price : अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याच्या किमतीत वाढ, चांदीही महागली! चेक करा रेट…
- कर्जाची रक्कम : 30 लाख रुपये
- कर्जाचा कालावधी : 20 वर्षे
- व्याज दर : वार्षिक 9.15%
- EMI : 27,282
- एकूण कार्यकाळात व्याज : ₹35,47,648
- एकूण पेमेंट : ₹65,47,648
अशाप्रकारे, कर्जाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तुमचे एकूण पेमेंट 65,47,648 रुपये असेल. यामध्ये तुम्ही 35,47,648 रुपयांच्या निम्म्याहून अधिक रक्कम व्याज म्हणून द्याल. तथापि, हे जाणून घ्या की तुम्ही तुमच्या CIBIL स्कोअर आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर आधारित गृहकर्जाच्या व्याजदरांची सौदेबाजी करू शकता. फ्लोटिंग दरांवरील व्याजदर सध्याच्या दरांपेक्षा कमी असू शकतात.
SBI सारख्या शेड्युल्ड बँकांकडून गृहकर्ज थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडलेले असतात. रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर व्यावसायिक बँका RBI कडून कर्ज घेतात. ऑक्टोबर 2019 पासून, रिझर्व्ह बँकेने बँकांना फ्लोटिंग रेटवर दिलेली वैयक्तिक कर्जे, वाहन कर्ज आणि गृहकर्ज इत्यादींना रेपो दराशी जोडणे बंधनकारक केले आहे. बहुतेक बँका रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) वर गृहकर्ज देत आहेत. त्याला एक्सटर्नल बेंचमार्क रेट (EBR) असेही म्हणतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा