

SBI Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारशिवाय सरकारी बँकांकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुमच्या मुलीला पूर्ण १५ लाख रुपये मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. माहिती देताना एसबीआयने म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण १५ लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरू शकता.
बँकेने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने सांगितले की, मुलींना बँकेकडून सुकन्या समृद्धी योजनेची सुविधा दिली जात आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त २५० रुपये जमा करून तुमच्या मुलीला करोडपती बनवू शकता. या सरकारी योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हमी उत्पन्नाचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळणार आहे. ही योजना खास मुलींसाठी आहे. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
हेही वाचा – Indian Railways : तीर्थयात्रा करण्याची सुवर्णसंधी..! राहणं-खाणं Free, जाणून घ्या संपूर्ण माहिती!
One-time #SSY registrations up to 12 years can be allowed, suggests SBI Researchhttps://t.co/SIam9tuTGE
— Financial Express (@FinancialXpress) January 17, 2023
याशिवाय सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. याशिवाय २ मुलींसाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. दुसरीकडे पहिली मुलगी झाल्यानंतर आणखी दोन जुळ्या मुली असतील तर अशा स्थितीत तिन्ही मुलींना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही हे खाते जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी उघडू शकता. जर तुम्ही या योजनेचे हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला ५० रुपये दंड भरावा लागेल.