SBI Gift : करोडो ग्राहकांना स्टेट बँकेकडून गिफ्ट..! वाढवले FD चे व्याजदर; जाणून घ्या किती मिळणार रिटर्न

WhatsApp Group

SBI Gift Before End Of The Year : आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. त्याचवेळी, वर्ष संपण्याच्या ३ आठवड्यांपूर्वी, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने करोडो ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. वास्तविक, SBI ने मुदत ठेव अर्थात FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत.

स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर आजपासून म्हणजेच १३ डिसेंबर २०२२ पासून लागू झाले आहेत. यापूर्वी, SBI ने २२ ऑक्टोबर २०२२ रोजी मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली होती.

सामान्य नागरिकांसाठी एसबीआयचे नवीन एफडी दर

  • ७ ते ४५ दिवस – ३%
  • ४६ ते १७९ दिवस – ४.५%
  • १८० ते २१० दिवस – ५.२५%
  • २११ दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – ५.७५%
  • १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी – ६.७५%
  • २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी – ६.७५%
  • ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी – ६.७५%
  • ५ वर्षे ते १० वर्षे – ६.२५%

हेही  वाचा – Gold Silver Price Today : ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर वधारले? वाचा आजच्या नव्या किमती

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयचे नवीन एफडी दर

  • ७ ते ४५ दिवस – 3.5%
  • ४६ ते १७९ दिवस – ५%
  • १८० ते २१० दिवस – ५.७५%
  • २११ दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – ६.२५%
  • १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी – ७.२५%
  • २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी – ७.२५%
  • ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी – ६.७५%
  • ५ वर्षे ते १० वर्षे – ७.२५%

हेही वाचा – ७वी ते १२वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी..! ६३,००० रुपयांपर्यंत पगार; ‘असा’ करा अर्ज!

रिझर्व्ह बँकेने या वर्षी आतापर्यंत रेपोमध्ये ५ वेळा वाढ केली आहे. चलनवाढ कमी करण्याच्या उद्देशाने, मध्यवर्ती बँकेने ७ डिसेंबर रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात आणखी ०.३५ टक्क्यांनी वाढ करून ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढ केली. उल्लेखनीय आहे की अलीकडे इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँक इत्यादींनीही त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दरवाढीची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment