SBI FD Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात (FD) वाढ केली आहे. ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या किरकोळ ठेवींवर आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवींवर करण्यात आली आहे. एफडीवरील नवे व्याजदर आजपासून लागू झाले आहेत. बँकेने 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर FD व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता तो 4.75 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँकेने या कालावधीसाठी एफडीवरील व्याजदर 5.25% वरून सहा टक्के केला आहे.
SBI च्या वेबसाइटनुसार, बँकेने 180 दिवसांवरून 210 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदरात 25 bps ने वाढ केली आहे. सर्वसामान्यांसाठी व्याजदर 5.75 टक्क्यांवरून सहा टक्के करण्यात आला आहे. 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर आता 6% ऐवजी 6.25% व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी तो 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे.
हेही वाचा – माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक!
बँकेने 7 ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवींवरील व्याजदरात 25 टक्के वाढ केली आहे. आता त्यांना पाच टक्क्यांऐवजी 5.25 टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्के करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी 5.75 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज 6.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के केले आहे. व्याजदर 180 दिवसांवरून 210 दिवसांपर्यंत 10 bps ने वाढवला आहे. सर्वसामान्यांना 6.6 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के व्याज मिळेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा