Saudi Arabian Woman Sentenced for Her Tweets : सौदी अरेबियाच्या एका महिलेला तिच्या ट्विटर पोस्टसाठी ३४ वर्षांचा तुरुंगवास आणि तितक्याच वर्षांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. ३४ वर्षीय सलमा अल-शेहाब हिला ट्विटरद्वारे देशातील असंतुष्ट आणि लोकशाही समर्थकांना फॉलो केल्याबद्दल आणि त्यांच्या पोस्ट रिट्विट केल्याबद्दल शिक्षा देण्यात आली आहे. दोन मुलांची आई असलेली सलमा यूकेच्या लीड्स विद्यापीठात पीएचडीची विद्यार्थिनी आहे. ती २०२० मध्ये सुट्टीच्या दिवशी घरी आली होती.
सलमा अल-शेहाब आपल्या मुलांना आणि पतीला ब्रिटनला घेऊन जाण्यासाठी आली होती, परंतु कथित देशविरोधी कारवायांबद्दल तिची चौकशी करण्यात आली आणि अखेरीस सौदी अरेबियाच्या न्यायालयानं तिला ३४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सार्वजनिक अशांतता निर्माण करण्यासाठी, नागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर करण्यासाठी इंटरनेट वेबसाइट वापरल्याबद्दल तिला यापूर्वी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, परंतु सोमवारी एका वकिलानं तिच्यावर इतर आरोप सादर केल्यावर तिची शिक्षा वाढवण्यात आली. सौदी अरेबियातील दहशतवादाच्या विशेष न्यायालयानं सलमाला शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा – VIDEO : “….तेव्हा मी रडत रडत ग्राऊंडच्या बाहेर गेलो”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ घटना!
सलमाची प्रोफाईल
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीच्या सार्वभौम वेल्थ फंड या सार्वजनिक गुंतवणूक निधीच्या माध्यमातून अमेरिकन सोशल मीडिया कंपनीमध्ये मोठ्या अप्रत्यक्ष भागीदारीवर नियंत्रण ठेवल्यानंतर सलमाला तिच्या ट्विटसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सलमा अजूनही नव्यानं अपील करू शकते, असं वृत्तात म्हटलं जात आहे. सलमाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरून असं दिसून येतं, की ती सौदी अरेबिया किंवा ब्रिटनमधील मोठी नेता नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमाचे ट्विटरवर दोन हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सलमा मुख्यतः सुन्नी देशातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबद्दल ट्वीट करत असे. मुस्लिम देशांच्या कट्टरपंथी विचारसरणीला ती आपल्या ट्वीटमधून प्रत्युत्तर द्यायची. तिनं अनेक कार्यकर्त्यांना फॉलो केलं आणि महिलांच्या हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर नेहमीच रिट्वीट केले. या सर्व कारणांमुळं सलमा आपल्या देशाची गुन्हेगार ठरली आणि तिला गुन्हेगार घोषित करण्यात आलं.
Salma al-Shehab is a 3⃣4⃣ year old mother of two boys.
She was sentenced to 3⃣4⃣ years in jail followed by a 3⃣4⃣ year travel ban in #SaudiArabia.
How old will she be when she's free?
1⃣0⃣2⃣ years oldHow old will her boys be?
7⃣4⃣ & 7⃣2⃣We won't let it stand. #FreeSalma pic.twitter.com/ia3vig6G3X
— The Freedom Initiative (@thefreedomi) August 16, 2022
हेही वाचा – रतन टाटांचं २५ वर्षांच्या ‘दोस्ता’सोबत नवं स्टार्टअप! वाचाल तर तुम्हीही सलाम ठोकाल!
सलमाचे इन्स्टाग्रामवर १५९ फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रोफाइलमध्ये तिनं स्वतःचं वर्णन दंतचिकित्सक, वैद्यकीय शिक्षक, लीड्स विद्यापीठातील पीएचडी विद्यार्थी, प्रिन्सेस नूरह बिंत अब्दुलरहमान विद्यापीठातील लेक्चरर, दोन मुलांची आई म्हणून वर्णन केले आहे. त्याचबरोबर सलमाचे ट्विटरवर २५९७ फॉलोअर्स आहेत. सलमाला शिक्षा सुनावल्यानंतर अनेक मानवाधिकार संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मोहम्मद बिन सलमान त्यांच्या दडपशाही धोरणांमुळं ट्विटर यूझर्संना कसं लक्ष्य करत आहेत हे या घटनेवरून दिसून येतं.