Saudi Arabia : एक मोठा निर्णय घेत सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना खासगी क्षेत्रातील इंजिनीयरिंग नोकऱ्यांमध्ये आरक्षण जाहीर केले आहे. किंगडमने आपल्या नागरिकांसाठी खासगी इंजिनीयरिंग नोकऱ्यांमध्ये 25 टक्के आरक्षण लागू केले आहे. हा निर्णय रविवारपासून लागू झाला, ज्याचा उद्देश सौदी नागरिकांना अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
मनुष्यबळ आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत इंजिनीयरिंग क्षेत्रातील सौदी नागरिकांची संख्या वाढेल, असा विश्वास आहे. सौदी अरेबियाची अधिकृत प्रेस एजन्सी सौदी प्रेस एजन्सीने सांगितले की, मंत्रालयाने नगरपालिका, ग्रामीण व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या सहकार्याने अभियांत्रिकी नोकऱ्यांमध्ये 25 टक्के स्थानिकीकरण कोटा लागू केला आहे.
सौदी प्रेस एजन्सीने म्हटले आहे की, ‘हे धोरण सौदीतील पुरुष आणि महिलांना अधिक चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल.’ या नवीन धोरणामुळे प्रत्येक खासगी क्षेत्रातील कंपनी ज्यामध्ये पाच किंवा त्याहून अधिक इंजिववीयर्स काम करत आहेत, त्यावर परिणाम होईल. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सौदी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
क्राउन प्रिन्स सलमानचे ‘व्हिजन 2030’
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘व्हिजन 2030’ अंतर्गत सौदी अरेबियाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल करत आहेत. या क्रमाने सौदी अरेबियाच्या विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये सौदी नागरिकांना प्राधान्य देण्यावरही सौदीकरणावर भर दिला जात आहे.
हेही वाचा –जगात अनेक ठिकाणी Youtube डाऊन, अपलोड होत नाहीयेत व्हिडिओ!
व्हिजन 2030 अंतर्गत, सौदीतील बेरोजगारी 7% वर आणण्याचे किंग्डनचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत सौदी अरेबियाला आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणून कच्च्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी करायचे आहे.
सौदीच्या नव्या पावलाचा भारतीयांवर परिणाम
सौदी अरेबियाच्या खासगी इंजिनीयरिंग क्षेत्रातील आरक्षणाचा भारतीयांवरही परिणाम होईल कारण दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय कामाच्या शोधात सौदी अरेबियात जातात. सौदी अरेबियाला नोकरीसाठी जाणाऱ्यांमध्ये इंजिनीअरसह कुशल आणि अर्धकुशल कामगारांचा समावेश आहे.
2022 मध्ये सौदी अरेबियाने म्हटले होते की, नोकरीसाठी राज्यात येणाऱ्या भारतीयांची संख्या 5 पटीने वाढली आहे. 2022 मध्ये 1,78,630 भारतीय नोकरीसाठी सौदीला गेले होते. आता सौदीने आपल्या नागरिकांसाठी खासगी इंजिनीयरिंग नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे, ज्यामुळे भारतीयांना या क्षेत्रातील संधी कमी होतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!