….तेव्हा शाहरुख खानच्या प्रॉडक्शन कंपनीच्या गेटवरून संतोष जुवेकरला हाकलवण्यात आलं!

WhatsApp Group

मुंबई : प्रॉडक्शन हाऊस इटर्नल सनशाईन या बॅनरखाली आलिया भट्टचा नवा चित्रपट ‘डार्लिंग्स’ नेटफ्लिक्सवर झळकला. या चित्रपटात आलियासोबत तुम्हाला शेफाली शाह, रोशन मॅथ्यू आणि विजय वर्मासारखे दमदार कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. शिवाय, आपला मराठमोळा कलाकार संतोष जुवेकरनंही चित्रपटात पोलिसाची भूमिका केली आहे. हा चित्रपट करण्याची संधी कशी मिळाली याचा सविस्तर खुलासा संतोषनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केला आहे. या पोस्टमध्ये एक किस्साही सांगितला, जो प्रेरणादायी आहे.

काय घडलं होतं?

१९९८मध्ये म्हणजेच स्ट्रगलिंगच्या काळात संतोषनं खूप धक्के खाल्ले. त्यातील एक घटना संतोषनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितली. तो आपल्या पोस्टमध्ये लिहितो, ”ते वर्ष १९९८ होतं आणि ठिकाण दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला प्रॉडक्शन ऑफिस). मी या प्रॉ़डक्शन ऑफिसच्या बाहेर उभा होतो. आत जाता येईल का? कुणाला भेटता येईल का? असं मी त्या गेटच्या वॉटमनला विचारतो. तेव्हा तो मला ओरडून “चल निघ इथून. कुणी बोलावलं तरच इथे यायचं. आता जा इथून” असं सांगतो आणि मी त्यावेळी थोडासा नाराज होऊन, त्याला म्हणतो, “तू थांबच…एके दिवशी तूच माझ्यासाठी हा गेट उघडशील.”

ही एक घटना झाल्यानंतर दुसऱ्या घटनेत संतोषनं २०२० या सालचा उल्लेख केला आहे. यात तो म्हणतो, ”मग काही वर्षांनतर मला एक कॉल येतो, “hi santosh sir m calling from redchillis entertainment can we meet? We want to cast u for our next film. वर्ष २०२०, ठिकाण – खार, सांताक्रूझ, Red Chillis Entertainment pvt ltd (शाहरुख खान प्रॉडक्शन ऑफिस). मी गेटवर माझ्या गाडीतून पोहोचतो. तेवढ्यात मला कॉल येतो “hi sir where r u? We r waiting for u.” मी त्यांना सांगतो की मी खाली आलोय आहे, पार्किंगसाठी जागा शोधतोय. तर तो मला म्हणतो, “sir please park inside wait i am sending someone to assist you”. आणि काही मिनिटात ऑफिसचं गेट उघडलं जातं वॉचमन धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो “sir plz आईये.” बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स…….ते शब्द कानावर पडतात आणि मला बाजूलाच उभा असतो १९९८ चा संतोष दिसतो. तो माझ्या पाठीवर कडक थाप मारतो णि म्हणतो “भाई य्ये मेरा शेर…..ज्जा जिले अपनी जिंदगी.”

हेही वाचा – २०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…

“कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है”, असं म्हणत संतोषनं आपला प्रेरणादायी प्रवास या पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. ज्या कंपनीच्या गेटवरूनच संतोषला हाकलवण्यात आलं आज त्याच कंपनीच्या चित्रपटामध्ये तो अभिनेता म्हणून काम करत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment