नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना काठमांडू न्यायालयाने त्याला आठ वर्षाचा तुरुंगवास सुनावला. 23 वर्षांचा संदीप आयपीएल खेळला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये एका 17 वर्षीय तरुणीने संदीप लामिछाने विरोधात काठमांडू येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तरुणीने संदीप लामिछाने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. हा आरोप करताना संदीप वेस्ट इंडिजमध्ये होता आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) जमैका तल्लावाहकडून खेळत होता. त्यानंतर अटक वॉरंट जारी होताच संदीपला तात्काळ देशात परतण्याचे आदेश देण्यात आले.
मात्र, वॉरंट बजावल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला, त्याचा पत्ता लागू शकला नाही. नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली होती. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदीप जेव्हा काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.
दुसरीकडे, अटक वॉरंट जारी होताच नेपाळने (CAN) देखील संदीपला निलंबित केले. मात्र, जानेवारी 2023 मध्ये संदीपला मोठा दिलासा मिळाला आणि त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर संदीप पुन्हा आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये परतला. गेल्या वर्षी काठमांडू येथे अटक होण्यापूर्वी संदीपने फेसबुकवर लिहिले होते की, आपण तपासाच्या सर्व टप्प्यांवर पूर्ण सहकार्य करू आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढू. तेव्हा संदीपने हे प्रकरण ‘षड्यंत्र आणि खोटे आरोप’ असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा – अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान, वाचा काय आहे सूक्ष्म सिंचन योजना?
संदीप लामिछानेने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नेपाळसाठी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळला. 2018 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संदीपने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच टी-20 इंटरनॅशनलमध्ये या फिरकी गोलंदाजाने 52 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!