उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव व्हेंटिलेटरवर..!

WhatsApp Group

Mulayam Singh Yadav Health : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची परिस्थिती नाजूक आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. मुलायम सिंह अनेक दिवसांपासून येथे उपचार घेत आहेत. त्यांना आयसीयूमध्ये हलवत असताना त्यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव आणि मुलगा प्रतीक त्यांच्यासोबत होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यांची प्रकृती खालावल्याने डॉ. नरेश त्रेहान, डॉ. सुनीता, डॉ. मनोज आणि डॉ. अभिषेक यांनी तपासणी केली.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादवही वडिलांच्या गंभीर प्रकृतीची माहिती मिळताच मेदांता येथे पोहोचले आहेत. सिंह यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ढासळत असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना या रुग्णालयात आणले होते. येथे पूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळपर्यंत सर्व काही ठीक होते, मात्र दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

हेही वाचा – IND Vs SA 2nd T20 : मैदानात घुसला साप..! थांबवावी लागली मॅच; पाहा VIDEO

८२ वर्षीय मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सिंग यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी आधीच कमी होती. त्यांच्या प्रकृतीबाबत मेदांता हॉस्पिटल व्यवस्थापन संध्याकाळी एक मेडिकल बुलेटिन जारी करेल, ज्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती दिली जाईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment