जिममध्ये हार्ट अटॅक येऊन मृत्यू..! बॉलिवूडमधून अतिशय दु:खद बातमी

WhatsApp Group

Salman Khans Body Double Dies : अभिनेता सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडे याचे निधन झाले आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना सागर पांडेला अचानक छातीत दुखू लागलं आणि तो जमिनीवर पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सागरच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. सागर बराच काळ बॉलिवूडचा भाग होता आणि सलमान खानच्या बॉडी डबल म्हणून काम करायचा. सागरचे वय ४० ते ४५ असल्याचे सांगण्यात येत आहे.

सागर पांडेही सलमान खानसारखा बॅचलर होता. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असलेला सागर हा ५ भावांमध्ये मोठा होता. संपूर्ण कुटुंबाचा खर्च सागर स्वतः उचलायचा. सागरने १९९८ पासून चित्रपटसृष्टीला सुरुवात केली. या वर्षी आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात सागरने सलमान खानच्या बॉडी डबलची भूमिका केली होती. सागर २०१९ च्या दबंग ३ मध्ये दिसला होता. ‘कुछ कुछ होता है’ नंतर सागर अनेक चित्रपटांमध्ये दिसला. सागर ‘बॉडीगार्ड’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’, ‘दबंग’, ‘दबंग २’ मध्ये दिसला आहे.

हेही वाचा – MotoGP ची भारताला मोठी भेट..! ‘या’ तारखेला होणार शर्यत; वाचा कधी, कुठे, कशी!

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सागर शुक्रवारी जिममध्ये व्यायाम करत होता. यादरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते जमिनीवर पडला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महापालिका रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आता साग पांडेच्या आकस्मिक निधनाने चित्रपट जगताला धक्का बसला आहे. तसेच हृदयविकाराच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

Leave a comment