VIDEO : सलमान खानला प्यायला वेळ नाही; अर्धा भरलेला ग्लास ‘भाईजान’नं पँटच्या खिशात ठेवला..!

WhatsApp Group

Salman Khan Viral Video : सलमान खान आपल्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता नुकताच तो एका पार्टीत दिसला. यादरम्यान सलमान पुन्हा एकदा एका खास कारणामुळे सर्वांच्या नजरेत आला. यावेळी सलमान हातात ग्लास घेऊन आपल्या पॅंटच्या खिशात टाकताना दिसला. त्यानंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, सलमान पार्टीला गेला तेव्हा त्याच्या हातात ग्लास होता. या ग्लासमध्ये नक्की काय आहे? असा सवाल प्रत्येकजण विचारू लाागला.

अनेकांनी सलमान खानच्या या प्रकाराला त्याची नवी स्टाइल म्हटलंय. अनेकजण त्याच्या दबंग लूकचे कौतुक करत आहेत. शनिवारी तो एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला असताना ही घटना घडली. व्हिडिओमध्ये कारमधून खाली उतरल्यानंतर तो जीन्सच्या खिशात अर्धा भरलेला ग्लास टाकताना दिसत आहे.

हेही वाचा – VIDEO : अरे बापरे..! ५० फुटांवरून खाली कोसळला आकाशपाळणा; दणकन आपटले लोक!

‘किसी का भाई किसी की जान’

सलमान खान नुकताच अंतिम, द फायनल ट्रुथ या चित्रपटात दिसला होता. तो लवकरच किसी का भाई किसी का जान आणि टायगर ३ मध्ये दिसणार आहे. ‘भारत’ आणि ‘अंतिम’नंतर सलमानचे चाहते त्याच्या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. ‘किसी का भाई, किसी का जान’च्या टीझर व्हिडिओमध्ये सलमान क्रूझर मोटरसायकलवरून लडाखच्या मैदानी भागात फिरताना दिसत आहे. त्याचे लांबसडक विखुरलेले केस जोराच्या वाऱ्यात वेगळंच वातावरण निर्माण करत आहेत. सलमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. अलीकडेच त्यानं त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये सलमानची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

हेही वाचा – २०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…

चित्रपटसृष्टीत ३४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलमाननं ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची घोषणा केली होती. मग त्यानं त्याची छोटीशी झलक दाखवली. यानंतर अवघ्या १० दिवसांनी सलमानने चित्रपटाचा छोटा टीझर व्हिडिओ रिलीज केला. या व्हिडिओमध्ये सलमान लडाखमध्ये फिरताना एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच इंटरनेटवर खळबळ उडाली आहे, शिवाय सलमान खानचा हा नवा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.  सलमान खानची आवडती शहनाज गिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

या चित्रपटात सलमान आणि शहनाजव्यतिरिक्त पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश, जस्सी गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आणि विनाली भटनागर देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे आधी नाव कभी ईद कभी दिवाली असे होते, मात्र नंतर त्याचे टायटल बदलण्यात आलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment