रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला! 200 क्षेपणास्त्र-ड्रोन्सने अनेक शहरे ‘टार्गेट’

WhatsApp Group

Russia Attacked Ukraine : रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने सुमारे 100 क्षेपणास्त्रे आणि 100 ड्रोनद्वारे कीवसह अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यासाठी रशियाने शेकडो सुसाईड ड्रोनचा वापर केल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. सुसाईड ड्रोन हे इराणने बनवलेले अतिशय धोकादायक ड्रोन मानले जातात. हा एक प्रकारचा आत्मघाती ड्रोन आहे ज्याची रेंज सुमारे 2500 किलोमीटर आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर कीवसह अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. रशियन लष्करी सूत्रांनी सांगितले की, युक्रेनमधील प्रमुख ऊर्जा पायाभूत सुविधा या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते.

रशियाने युक्रेनच्या 15 भागांवर ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेनिस सिंहल यांनी दिली आहे. एवढेच नाही तर रशियाने किंजल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचाही वापर केल्याचे युक्रेनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. रशियन ड्रोन अजूनही युक्रेनच्या आकाशात घिरट्या घालत असल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोनचा एक गट राजधानी कीवच्या दिशेने जात आहे. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने आतापर्यंत 15 क्षेपणास्त्रे आणि 15 ड्रोन पाडले असल्याचे कीव लष्करी प्रशासनाने म्हटले आहे.

या हल्ल्यांनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर एक निवेदन जारी केले आहे. झेलेन्स्की म्हणाले की, पुतिन हे आजारी व्यक्ती आहेत त्यांनी रशियाच्या हल्ल्याला आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले आणि सांगितले की, कीव, ओडेसासह अनेक शहरांवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यासाठी रशियाने ‘सुसाईड ड्रोन’चा वापर केल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या हल्ल्यात दुर्दैवाने अनेक लोक मारले गेले आणि त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.

हेही वाचा – आम्हाला सांगताना लाज वाटतेय, छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला!

झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की पुतीन तेच करू शकतात जे त्यांना जग करू देते. ते म्हणाले की, कठोर निर्णय न घेतल्याने दहशतवादाला खतपाणी मिळते. ते म्हणाले की हे युद्ध न्याय्यपणे संपवण्यासाठी कोणता निर्णय घेणे आवश्यक आहे हे जगभरातील सर्व नेते आणि आपल्या सर्व मित्रपक्षांना माहीत आहे.

याआधी आज युक्रेनने रशियातील साराटोव्ह येथील 38 मजली इमारतीवर ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्याचे वर्णन अमेरिकेचा 9/11 हल्ला असे केले जात आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियातील साराटोव्ह येथील सर्वात उंच निवासी इमारतीला लक्ष्य केले आहे. या ड्रोन हल्ल्यात अर्ध्या इमारतीचे नुकसान झाले असून एक महिला गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे मोठे वक्तव्य आले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये कोणतीही गुप्त चर्चा होत नसल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे. तसेच, या संवादाची वेळ आता संपली आहे. कुर्स्कमध्ये युक्रेनच्या हल्ल्याला नक्कीच योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असे क्रेमलिनने म्हटले आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment