Rules Changing From 1 March 2023 : १ मार्चपासून अनेक नवीन नियम लागू होतील आणि यामुळे तुमच्या मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. मार्च महिन्यात सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी सिलिंडर, बँकांच्या सुट्ट्या इत्यादींसह अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. त्याच वेळी, ट्रेनच्या वेळापत्रकात देखील बदल पाहिले जाऊ शकतात.
बँक कर्ज होऊ शकते महाग
रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांनी MCLR दर वाढवले आहेत. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. कर्जाचे व्याजदर वाढू शकतात आणि ईएमआयचा बोजा सर्वसामान्यांना त्रास देऊ शकतो.
LPG आणि CNGच्या वाढू शकतात किमती
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला निश्चित केल्या जातात. गेल्या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नसली तरी यंदा सणासुदीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये १२ दिवस बँका बंद
मार्चमध्ये होळी आणि नवरात्रीसह १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये बँकांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. भारतातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी खुल्या असतात. तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्च २०२३ च्या कॅलेंडरनुसार, खासगी आणि सरकारी बँका १२ दिवस बंद राहतील.
हेही वाचा – Maruti Baleno : फक्त ४ लाखात मिळतेय मारूती बलेनो..! सोडू नका अशी सुवर्णसंधी; वाचा!
ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
त्याचबरोबर उन्हाळ्याच्या आगमनामुळे भारतीय रेल्वे वेळापत्रकात काही बदल करू शकते. त्याची यादी मार्चमध्ये जाहीर होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १ मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि ५००० मालगाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.
सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्ये संभाव्य बदल
अलीकडेच भारत सरकारने आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आता भारताच्या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्टवर नवा नियम लागू होणार आहे. हा नवा नियम मार्चमध्ये लागू होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने पोस्ट केल्याबद्दल वापरकर्त्यांना दंड देखील भरावा लागू शकतो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!